Breaking

Saturday, April 29, 2023

गुळाचा गोळा समजून बॉम्ब फोडला, आवाजाने अख्खा परिसर हादरला, महिला... https://ift.tt/PBze4Vy

पाटणा: बिहारच्या बक्सरमध्ये एका महिलेचा निष्काळजीपणा तिच्या जीवावर बेतता बेतता राहिला. गुळाचा गोळा समजून या महिलेने बॉम्ब जमिनीवर फेकला. त्यानंतर या बॉम्बचा मोठा स्फोट झाला आणि महिला गंभीर जखमी झाली. स्फोटाचा आवाज ऐकून महिलेच्या कुटुंबीयांसह आजूबाजूचे लोकही हैराण झाले. महिलेला गंभीर अवस्थेत उपचारासाठी वाराणसीच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.ही घटना बक्सरच्या इटाधी पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या बाला देवा गावातील आहे. गावकरी रामनाथ राम यांच्या घरी एक बॉम्ब ठेवलेला होता. शनिवारी सकाळी रामनाथची पत्नी शांती यांनी गुळाचा गोळा समजून बॉम्ब गच्चीवर नेला. त्यानंतर तिने गुळाचा गोळा समजून बॉम्ब फोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे बॉम्बचा जोरदार स्फोट झाला आणि त्यात त्या जखमी झाल्या.मोठा स्फोट झाला, त्याच्या आवाजने संपूर्ण घर हादरले. स्फोटाचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि आजूबाजूचे लोक टेरेसवर पोहोचले. शांती या गंभीर जखमी होऊन गच्चीवर पडल्या होत्या. त्यानंतर पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती देण्यात आली आणि शांतीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. शांतीची प्रकृती पाहता त्यांना वाराणसीला रेफर करण्यात आले.या घटनेची माहिती देताना बक्सरचे एसपी मनीष कुमार म्हणाले की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बॉम्बशोधक पथक आणि एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाठवण्यात आले. महिलेच्या पतीकडे बॉम्ब कुठून आला याची माहिती घेतली जात आहे. तसेच आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली जात आहे. याप्रकणी पोलिस कारवाई करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/N5k9R7p

No comments:

Post a Comment