Breaking

Monday, April 10, 2023

कॉलेजच्या विद्यार्थिनी बनून निघालेल्या, दोघींना संशय येताच अडवलं, गाडीची डिग्गी उघडताच पोलीस हादरले https://ift.tt/SOYI2bT

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भोपाळमध्ये दोन तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थिनी बनून तस्करी करत होत्या. दोन्ही तरुणी महाविद्यायीन विद्यार्थिनी बनून स्कुटीत दारु लपवून तस्करी करत होत्या. या दोन तरुणांनी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं अडवलं तेव्हा ही धक्कादायक बाब उघडकीस आली. पोलिसांनी त्या तरुणींपासून देशी दारुच्या १०० बाटल्या जप्त केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राजधानी भोपाळच्या भानपूर भागात दारुची तस्करी होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यांनी स्कुटीवरुन प्रवास करणाऱ्या दोघींना अडवलं. त्यांच्या तपासणी करण्यात आली. स्कुटीची तपासणी करण्यात आली तेव्हा डिग्गीतून एका पिशवीत दारुच्या १०० बाटल्या आढळल्या. उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्यानं त्या दोन तरुणींना अडवलं त्यावेळी त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असल्याचं सांगितलं. मात्र, पथकाला संशय आला त्यावेळी त्यांनी चौकशी आणि तपासणी सुरु केली. गाडीची कागदपत्रं देखील मागण्यात आली. मात्र, त्याचवेळी गाडीची डिग्गी उघडताच त्यात दारुच्या बाटल्या असल्याचं स्पष्ट झालं. दोन्ही तरुणी भोपाळच्या छोला रोड आणि करोंदे येथील रहिवासी आहेत. दोघी बऱ्याच दिवसांपासून दारुची तस्करी करत होत्या. एका तरुणीचं नाव दिव्या असून तिचा भाऊ देखील दारुची तस्करी करताना पकडला गेला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळं तो दारु विक्री करु शकत नव्हता. त्यामुळं दोन्ही तरुणी दारु विक्री करत होत्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/bTHf539

No comments:

Post a Comment