Breaking

Sunday, April 2, 2023

मोदींचा जगात डंका; बायडेन, सुनकना मागे सारत बनले सर्वात लोकप्रिय नेते, पाहा कोण कुठल्या स्थानी https://ift.tt/U2yQclO

नवी दिल्ली : पंतप्रधान यांची पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष , ब्रिटनचे पंतप्रधान यांच्यासह १६ देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे. ११ देशांच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिले स्थान मिळाले आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सप्टेंबर २०२१ नंतर सातत्याने वाढताना दिसत आहे.मॉर्निंग कन्सल्टने जाहीर केलेल्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल लिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी २२ देशांच्या नेत्यांना मागे टाकले आहे. सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींना प्रौढ लोकांमध्ये ७६ टक्के मान्यता मिळाली आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस लोपेझ ओब्राडोर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत, ६१ टक्के प्रौढांची ते पहिली पसंती ठरले आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अ‍ॅलेन बेर्सेट. त्याला ५५ टक्के मान्यता रेटिंग मिळाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना या यादीतील पहिल्या पाच क्रमांकांमध्येही स्थान मिळालेले नाही. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना या यादीत दहाव्या क्रमांकावरही स्थान मिळालेले नाही. त्याचे जागतिक नेते म्हणून मान्यता रेटिंग ३४ टक्के आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या यादीत सातवे स्थान मिळाले आहे. त्याचे ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ४१% आहे. हे रेटिंग २२ ते २८ मार्च २०२३ दरम्यान गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/npUxdq8

No comments:

Post a Comment