मुंबई : सूर्यकुमार यादवने या सामन्या त मुंबईच्या विजयाचा पाया रचला. पण सूर्याकडून एक वाईट गोष्ट या सामन्यात घडली. कारण सामना सुरु असताना सूर्याने अपशब्द वापरल्याचे पाहायला मिळाले. सूर्याचा हा व्हिडिओ सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे.सूर्याने यावेळी पहिल्यात चेंडूवर अश्विनला षटकार खेचला आणि आपले इरादे स्पष्ट केले होते. या षटकारानंतर सूर्याने दमदार फटकेबाजी केली आणि त्याने मुंबइच्या विजयाचा मार्ग बनवला. सूर्याने यावेळी २४ चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. त्यामुळे आता सूर्या मोठी खेळी साकारेल आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करेल, असे वाटत होते, पण सूर्याला मात्र तसे करता आले नाही. कारण राजस्थानने त्याला बाद करण्यासाठी चांगलेच प्लॅनिंग केले होते. ट्रेंट बोल्टने यावेळी सूर्या जिथे फटके जास्त मारतो तिथे खेळाडू लावला नव्हता. त्यामुळे सूर्याला आपल्यासाठी हे खुले कुरण असल्याचे वाटले. त्यामुळ सूर्या तिथे फटका मारायला जाणार हे ट्रेंट बोल्टला माहिती होते. त्यानुसार बोल्टने चेंडूही टाकला. बोल्टच्या या जाळ्यात सूर्या चांगलाच अडकला. कारण हा फटका मारताना सूर्या चुकला आणि चेंडू हवेत उडाला. त्यावेळी हा झेल पकडण्यासाठी संदीप सिंग धावत गेला. त्यावेळी हा तो झेल पकडणार की नाही, याचू उत्सुकता सर्वांना होती. पम संदीपने यावेळी झेल पकडला आणि सूर्या ५५ धावांवर बाद झाला.सूर्या चांगल्या फॉर्मात होता. त्यामुळे तो या सामन्यात शेवटपर्यंतक राहील, असे सर्वांना वाटत होते. पण आपला आवडता फटका मारतानाच सूर्या बाद झाला आणि याचा त्याचा सर्वात जास्त राग आला. संदीपने कॅच पकडली की नाही हे पंच तपासत होते. तिसऱ्या पंचांनी यावेळी सूर्या हा बाद असल्याचे जाही केले. त्यावेळी सूर्याने शिवी दिल्याचे पाहायला मिळाले. सूर्याची ही शिवी एका व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे सूर्याकडून ही चूक घडली आहे हे मात्र नक्की.क्रिकेच हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे आणि सूर्याला कोणीही काही म्हटले नव्हते. पण तरीही सूर्याने यावेळी दिल्याचे पाहायला मिळाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FQduxgc
No comments:
Post a Comment