Breaking

Wednesday, May 3, 2023

Crime News: हॉटेलच्या खोलीत शिरताच उग्र वास, त्याला वाटलं पायाची दुर्गंधी, पण बेडखाली बघताच हादरला https://ift.tt/u4XmxVi

तिबेट: पर्यटकांसोबत अनेकदा विचित्र विचित्र घटना घडत असतात, जे ते सोशल मीडियावर शेअर करतात. काहीच दिवसांपूर्वी एका पर्यटकाने सांगितलेलं की तो खोलीत झोपलेला असताना त्याच्या जवळ एक साप येऊन बसला. आता आणखी एका पर्यटकाने हॉटेलच्या खोलीतील एक भयानक अनुभव सांगितला आहे. तिबेटमध्ये ही घटना घडली. जिथे एका पर्यटकाला त्याच्या हॉटेलच्या खोलीतील बेडच्या खाली चक्क एक मृतदेह आढळला. हे पाहताच पर्यटकाची चांगलीच भंबेरी उडाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनचे रहिवासी झांग यांना प्रवासाची खूप आवड आहे. ते अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. एके दिवशी ते तिबेटमधील ल्हासाला भेट देण्यासाठी आला. त्यांनी एका आलिशान हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. खोलीत गेल्यावर त्याला उग्र वास येत होता. पण, ती दुर्गंधी त्यांच्या पायाची असावी असं त्यांना वाटलं.झांग थकले होते, म्हणून ते खोलीतच झोपी गेले. ते 3 तास झोपले, मग काही वेळ बाहेर फिरुन आले. त्यानंतर त्यांनी जेवण केलं आणि ते आपल्या खोलीत परतले. जे ते खोलीत परतले तेव्हा त्यांना पुन्हा तीव्र दुर्गंधी जाणवली. तेव्हा त्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना दुसरी खोली देण्यास सांगितले. त्याला दुसरी रूम मिळाली पण काही वेळाने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रूम साफ केल्याचे त्यांना सांगितले. तसेच, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पुन्हा त्या खोलीत जाऊ शकता असंही सांगितलं. त्यामुळे झांग पुन्हा त्या खोलीत गेले. तेव्हा त्यांच्या पायाला कसला तरी स्पर्श झाला आणि ते जोरदार किंचाळले. त्यांच्या बेडखाली मृतदेह होता. हे पाहून झांग खूप घाबरले. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. झांग यांचा जबाब घेतला. जेव्हा पोलिसांनी याप्ररणाचा तपास सुरु केला तेव्हा त्यांना कळालं की या प्रकरणातील आरोपीला त्यांनी आधीच अटक केली आहे. झांद यांनी ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर पोस्ट केली जी काही वेळातच व्हायरल झाली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wpEeBRZ

No comments:

Post a Comment