सोलापूर: विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईने स्वतःच्या दोन लेकरांचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजस्व नगर परिसरात ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. नवरा बायकोच्या भांडणाच्या कारणावरून ही घटना घडली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ज्योती सुहास चव्हाण (वय २७) असे महिलेचे नाव आहे. तर अथर्व सुहास चव्हाण (वय ३.५ वर्ष) आणि आर्या सुहास चव्हाण (वय २ वर्ष) अशी दोन चिमुकल्यांची नावं आहेत. या घटनेने सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.जन्मदात्या आईने उीसने मुलांचं तोंड दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर तिने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना विजापूर रस्त्यावरील राजस्व नगरात गुरुवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान घडली आहे. पोतदार शाळेसमोर चव्हाण यांचे घर आहे. गुरुवारी दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान ही घटना घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.पती-पत्नीच्या भांडणात चिमुकल्यांचा बळीमयत ज्योती हिचे पती सुहास चव्हाण हे एसटी महामंडळात लिपिक या पदावर काम करतात. त्यांच्यात आणि त्यांची पत्नी ज्योती यांच्यात कौटुंबिक कारणातून नेहमी वाद होत होते. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. अगोदर पोटच्या लेकरांना संपविले आणि नंतर स्वतः आत्महत्या केलीशाळेला सुट्टी असल्याने अथर्व आणि आर्या हे दोघेही घरीच होते. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ते दोन्ही लेकरं टीव्ही पाहण्यात दंग होते. त्यावेळी ज्योतीने टीव्हीचा आवाज आणखी वाढविला. त्यानंतर मुलांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांचं तोंड दाबलं. यामुळे श्वास गुदमरुन मुलांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मुलांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर ज्योती यांनी बेडरूममध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. ज्योती ही पतीवर संशय घेत होतीगुरुवारी सायंकाळी पाच नंतर पोलिसांना याबाबतची खबर मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ज्योती यांच्यासह अथर्व आणि आर्या यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मयत ज्योती ही पती सुहास यांच्यावर संशय घेत होती. या कारणातून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. यातूनच ज्योती यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सुहास यांनी पोलिसांना सांगितले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हनपुडे पाटील यांनी दिली. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी सुहास चव्हाण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्रीपर्यंत उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZdFc382
No comments:
Post a Comment