चेन्नई : सुनील गावस्कर आणि महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेटमधील दोन महान खेळाडू. पण या दोघांनी चेन्नईचा सामना संपल्यावर सर्वांची मनं जिंकल्याची पाहायला मिळाले. चेन्नईचा हा त्यांच्या घरच्या मैदानातील अखेरचा सामना होता. पण या सामन्यात त्यांना केकेआरकडून पराभव पत्करावा लागला. चेन्नईचा पराभव झाला असला तरी चाहते जास्त निराश नव्हते. या गोष्टीला कारण ठरला धोनी. कारण हा चेन्नईचा अखेरचा सामना होता. त्यामुळे धोनी सामना संपल्यावर आपल्या मैदानातील चाहत्यांना काही भेटवस्तू देत होता आणि त्यामुळे चाहते धोनीची एक झलक जवळून पाहण्यासाठी उत्सुक होते. त्याचवेळी गावस्कर हे धोनीच्या जवळ गेले आणि त्यांनी जी गोष्ट केली त्यामुळे क्रिकेट चाहते अजूनच खूश झाले.हा सामना संपल्यावर धोनीची एक छोटेखानी मुलाखत झाली. ही मुलाखत संपल्यावर चेन्नईच्या संघाचा पूर्ण स्टाफ त्याची वाट पाहत होता. कारण त्यांनी आपल्याकडे बऱ्याच भेटवस्तू घेतल्या होत्या. या भेटवस्तू धोनी आपल्या चाहत्यांना देणार होता. चेन्नईच्या संघातील या व्यक्ती धोनीच्या हातात या वस्तू देत होते आणि धोनी ते स्टेडियममधील चाहत्यांच्या दिशेने फेकत होता. त्यावेळी चाहते या भेटवस्तू मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते. पण ही सर्व गोष्ट सुरु असताना मैदानात धोनीला भेटायला आले ते सुनील गावस्कर. गावस्कर भेटायला आल्याचे कळताच धोनीही थोडा थांबला. त्याने आपल्या चाहत्यांना भेटवसू देणे थोडा वेळ थांबवले. त्यानंतर धोनी आणि गावस्कर यांच्यामध्ये काही काळ बोलणे झाले. त्यानंतर धोनीने थेट आपला हात त्यांच्या शर्टच्या जवळ नेला. धोनीने गावस्कर यांना त्यांच्या शर्टवर आपली सही दिली आणि त्या दोघांमध्ये एकच स्मितहास्य पाहायला मिळाले. सही मिळाल्यावर गावस्कर यांनी धोनीला मिठी मारली आणि त्यानंतर त्यांनी त्याला शुभेच्छाही दिल्या. आतापर्यंत आयपीएलमध्ये अशी गोष्ट पाहायला मिळाली नव्हती. पण या सामन्यानंतर मात्र धोनी आणि गावस्कर या दोन्ही चाहत्यांमध्ये ही गोष्ट यावेळी पाहायला मिळाली. धोनी आणि गावस्कर हे दोघेही महान खेळाडू आहेत. त्यामुळे या दोघांनी जे काही केलं त्यामुळे चाहते खूश झाले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zerNvK9
No comments:
Post a Comment