Breaking

Saturday, May 20, 2023

कुंपणानेच शेत खाल्ले! धाराशिवमधील सर्वात मोठ्या बँकेत महाघोटाळा, कोट्यवधींचा अपहार, फसवणूक https://ift.tt/CaNoSUh

: ५ कोटी ४६ लाख १२ हजार रुपयेच्या अपहार व फसवणुक प्रकरणी धाराशिव जनता सहकारी बँकेच्या तत्कालीन तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरुध्द धाराशिव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय.या बाबत अधिक माहिती अशी की, २८ सप्टेंबर २००५ ते ३१ मार्च २००८ दरम्यान धाराशिव जनता सहकारी बँकेचे तत्कालीन चेरमन, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगनमत करून नियमबाह्य पद्धतीने बॉण्ड खरेदी केले. हे करताना त्यांनी नोएडा टोल ब्रिज कंपनी लि. ही कंपनी दिवाळखोरीत असताना व त्या कंपनीची पडताळणी केली नाही. तसेच त्या कंपनीमध्ये मुंबईच्या एसीई गिल्टस ट्रेडींग प्रा.लि. या ब्रोकर कंपनीच्या मार्फत जैन सहकारी बॅक लि. आणि बेंगळुरूच्या दि टेक्सस्टाईल को.ऑपरेटीव्ह बॅक लि. येथील खात्यावरुन एकूण ४४०० डिप डिस्काउंट बॉन्ड खरेदी करण्यासाठी प्रत्येकी २३००० रुपयांप्रमाणे असे जास्तीची रक्कम देऊन नियमबाह्य पध्दतीने बॉन्ड खरेदी केली. तसेच रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया यांच्या नियमावलीचे उल्लंघन करुन ५ कोटी ४६ लाख १२ हजार इतक्या धाराशिव जनता सहकारी बॅकेतील सभासद व ठेवीदार यांच्या रक्कमेचा अपहार करुन फसवणूक केली. या कारणामुळे धाराशिव जनता सहकारी बॅकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरुध्द धाराशिव जनता सहकारी बँकेचे सभासद प्रविण विष्णुपंत धाबेकर ( वय ५३ वर्षे, व्यवसाय टाटा शोरुम, रा. शंत्रुजय बिल्डींग, तांबरी विभाग, धाराशिव) यांनी धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर १७३/२०२३ भा.द.सं. कलम ४२०, ४०९, ३४ अन्वये १९ मे २०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ हे करीत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0jRGxAu

No comments:

Post a Comment