Breaking

Saturday, May 20, 2023

मुंबईला वीजचोरीचे चटके; बेस्ट, टाटा, अदानी कंपन्यांच्या पोलिसांत २० दिवसांत ३५ तक्रारी https://ift.tt/WrP5fsD

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मागणीच्या तुलनेत विजेची कमतरता आणि त्यातच वाढत्या तापमानामुळे विजेचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यातच वीजचोरीचा मोठा प्रश्न कंपन्यांना भेडसावत आहे. मुंबईसारख्या शहरांमध्येही वीजचोरीचे प्रमाण वाढले असून याच महिन्यात पंधरा ते वीस दिवसांत वीजचोरीचे ३५हून अधिक गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. बेस्ट, टाटा, अदानी अशा सर्वच कंपन्यांच्या तक्रारी येत असून त्यानुसार भारतीय विद्युत कायद्यान्वये हे गुन्हे दाखल केले जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.विशेषत: उपनगरांमध्ये वीजचोरीचे प्रमाण अधिक असल्याचे वीज कंपनीच्या दक्षता पथकांच्या कारवाईवरून दिसून येते. कांदिवली पूर्वेकडील लोखंडवाला टाऊनशिपमधील सफायर हाइट या इमारतीमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटीचे दक्षता पथक पाहण्यासाठी गेले होते. या ठिकाणी असलेल्या एका फ्लॅटमध्ये कोणत्याही मीटरविना थेट विद्युत जोडणी घेण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत सोसायटीच्या केबिनबाबत सुरक्षारक्षकाला विचारले असता त्याने मालकाला फोन लावून दिला. मालकाने दक्षता पथकातील अधिकाऱ्यांना फोनवर शिवीगाळ केली. त्यांच्या सांगण्यावरून सुरक्षारक्षकाने केबिनमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी लोखंडी रॉडने पथकावर हल्ला केला. वीजचोरी आणि हल्ला केल्याप्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगेश्वरीत साडेसहा लाखांची वीजचोरीजोगेश्वरी येथील शर्मा डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याची तक्रार आल्याने अदानी इलेक्ट्रिसिटीच्या दक्षता पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता. एकाच मीटरमधून वेगवेगळ्या प्रकारे टी कनेक्शन आणि इतर मार्गाने वीज जोडण्यात आली होती. इतकेच नाही तर विजेच्या वापराचे रिडिंग कमी यावे यासाठी मीटरमध्येही छेडछाड केल्याचे दिसून आले. वापरामध्ये असलेली उपकरणे यावरून चोरी करण्यात आलेल्या विजेचे मूल्यांकन केले असता जवळपास साडेसहा लाखांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5gRxUEr

No comments:

Post a Comment