धुळे : धुळे शहरातील कुमार नगर (सिंधी कॅम्प) येथे एका व्यक्तीने आपल्या मेहुणीवर जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. आज दुपारी सायंकाळच्या सुमारास त्याने हा हल्ला केला. हरेश परसराम आसीजा असे या व्यक्तीचे नाव आहे. तर प्राची बंटी खेमानी अशे त्याच्या मेहुणीचे नाव आहे. हरेशने प्राचीच्या गळ्यावर व तोंडावर धारदार शस्त्राने चार ते पाच वार करून गंभीर जखमी करीत प्राचीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या नंतर हरेशने लागलीच घरी जाऊन गळफास घेऊन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.हरेशने प्राची हिला गंभीरित्या जखमी का केले हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही. या घटनेनंतर प्राचीला तात्काळ धुळे शहरातील साक्री रोडवरील सेवा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या गंभीर आहे. तर दुसरीकडे प्राची हिच्यावर प्रांगणात हल्ला केल्यानंतर हरेश परसराम आसीजा याने शिव रेसिडेन्सी गणेश कॉलनी येथे आपल्या घरी जाऊन गळ्याला फाशी लावत आपले जीवन संपवले. प्राचीवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून अद्याप पर्यंत तिच्यावर हरेशने हल्ला का केला, यामागील कारण समजू शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे कुमार नगर भागात व गणेश कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सिंधी समाजाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते गुलशन उदासी यांनी तत्काळ धुळे शहर पोलिसांना खबर देऊन जखमी प्राची खेमानी हिस सेवा हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केले. घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी लागलीच मेव्हण्याचा शोध सुरू केला. त्याच्या मोबाइलच्या लोकेशनुसार पोलिस त्यांच्या घरी गेले असता हरेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान चाकूहल्ला केल्यानंतर त्याने प्राची मयत झाली असावी असा विचार केला आणि या भितीने घरी जावून गळफास घेत आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पीएसआय तिगोटे यांना घेऊन हरेश आसीजा यांच्या घरी जाऊन पंचनामा करण्यात आला आहे. मयत हरेश परसराम आसीजा यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे. तर जखमी प्राची बंटी खेमानी हिला दोन मुले आहेत. सदर घटनेमुळे कुमार नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TcFPXeE
No comments:
Post a Comment