म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यात विविध अपघातांमध्ये नाहक बळी जाणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहेच. पण, कोणतेही वाहन न वापरता केवळ रस्त्यावरून चालताना कधी खबरदारी न घेतल्याने, तर कधी चालकांच्या हलगर्जीने जीव धोक्यात येतो. राज्यामध्ये गेल्या चार वर्षांत १०,६३४ पादचाऱ्यांनी जीव गमावला आहे.राज्यामध्ये लहान-मोठ्या रस्त्यापासून महामार्गांपर्यंत सुमारे तीन लाख २४ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर दरवर्षी साधारण ३० ते ३३ हजार अपघात घडतात. यामध्ये सरासरी १२ ते १४ हजार नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो. या मृतांमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक पादचाऱ्यांचा समावेश असतो. २०१९ ते २०२२ या चार वर्षांतील आकडेवारी पाहिली असता १०,६३४ पादचाऱ्यांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. एकूण २५,३६२ अपघातांमध्ये १२,६३७ पादचारी गंभीर जखमी झाले असून ३,५९२ पादचाऱ्यांना किरकोळ इजा झाली आहे. अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी पादचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेने चालताना, रस्ता ओलांडताना तर चालकांनी गाड्या चालविताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे महामार्ग पोलिसांनी म्हटले आहे.राज्यातील अपघातांमध्ये जखमी, मृत होणाऱ्या पादचाऱ्यांची आकडेवारी काळजी करण्यासारखी आहे. ही संख्या कमी करण्यासाठी आम्ही प्राधान्याने प्रयत्न करीत असून वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांनीही विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.डॉ. रवींद्रकुमार सिंगल, अतिरिक्त पोलिस महासंचालक, महामार्ग पोलीसवर्ष अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी दुखापत नाही२०१९ ७२९४ २८४९ ३३०० १२४७ ०१२०२० ५१५६ २२१४ २३१२ ६३१ ३६२०२१ ६१४८ २६७७ २६८४ ७९४ १९२०२२ ६७६४ २८९४ २९५२ ९२० ५९अतिक्रमणही कारणीभूतपादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे पदपथ उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असते. परंतु मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये पदपथांवर फेरीवाले, बेघरांनी अतिक्रमण केलेले दिसते. त्यामुळे पादचाऱ्यांना नाईजास्तव रस्त्यावरून चालावे लागतात. शहरांमध्ये अरूंद रस्ते, रस्त्याच्या कडेलाच उभी केलेली वाहने, वाहनांची अधिक संख्या अशी परिस्थितीही असते. त्यातून वाट काढताना पादचारी अपघातांना बळी पडतात. छोट्या रस्त्यांवर पादचाऱ्यांचे होणारे अपघात रोखण्यासाठी त्यांना पदपथ उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.पादचाऱ्यांसाठी खबरदारी- ज्या ठिकाणी उपलब्ध असेल, तेथे क्रॉसवॉक आणि पादचारी क्रॉसिंग वापरा.- ट्रॅफिक सिग्नल शोधा आणि योग्य सिग्नल सुरक्षितपणे पार होण्याची वाट पहा.- मोबाइल फोन किंवा हेडफोन यांसारख्या लक्ष विचलित करणाऱ्या साधनांचा वापर टाळा.- शक्य तेथे पदपथांवर चाला आणि नसल्यास वाहने दिसावीत यासाठी येणाऱ्या रहदारीकडे तोंड करून चाला.- कायम रहदारीच्या किंवा महामार्गावर चालणे टाळा- मुलांना रस्तेसुरक्षतेबद्दल शिक्षण द्याचालकांसाठी सूचना- वाहनांबरोबर रस्त्यावर पादचारी, जनावरे येतात, याचे भान असू द्या- गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंगवर वाहनाचा वेग कमी करा- सिग्नलचा नियम काटेकोरपणा पाळा- रात्रीच्या वेळेस हेडलाइट सुस्थितीत आहेत का, याची खात्री करा- कुणी रस्ता ओलांडताना दिसल्यास वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2ahgIey
No comments:
Post a Comment