Breaking

Wednesday, May 31, 2023

राष्ट्रवादीचे सगळे नेते फुले कुटुंबाचे भक्त असल्याचे भासवतात; प्रकाश आंबेडकरांचा टोला https://ift.tt/OdGKz8S

दौंड : महापुरुषांचा अपमान थांबवायचा असेल तर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख यांनी केले. प्रकाश आंबेडकर बुधवारी दौंड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात सावरकर जयंतीच्या कार्यक्रमावेळी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यावरुन निर्माण झालेल्या वादासंदर्भात भाष्य केले. गोवारींची चेंगराचेंगरी ज्यावेळी झाली होती त्यावेळी मखराम पवार यांनी असं म्हटलं होते की, ज्या सभागृहांमध्ये संवेदनशीलता नाही, त्या सभागृहामध्ये मी राहत नाही. असे म्हणत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. आता राष्ट्रवादीचे सगळेच नेते आणि विशेष करून छगन भुजबळ हे सगळ्यात मोठे फुले कुटुंबाचे भक्त आहेत असं भासवतात. माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी मखराम पवारांचा कित्ता गिरवावा आणि सावित्रीबाईंचा आणि अहिल्यादेवींचा पुतळा हटवण्याच्या निषेधार्थ राजीनामा द्यावा, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. सावित्रीबाई आणि अहिल्यादेवींचा पुतळा हलवला होता, हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. याबाबत निषेध करून राजीनामा द्यावा. वारंवार महापुरुषांचे होणारे अपमान थांबवायचे असेल तर कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. मखराम पवार यांच्या राजीनाम्याचा फायदा असा झाला की, त्यावेळी गोवारींच्या सगळ्या मागण्या सरकारने तात्काळ मान्य केल्या, याकडे प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.आगामी लोकसभा निवडणुकीवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की,अजून दीड वर्ष आहेत लोकसभेच्या निवडणुकीला. आमची काही तयारी नाहीये निवडणुका लागतील तेव्हा लढू, असे आंबेडकर यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारकडून छगन भुजबळ यांची मागणी मान्य

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इंडिक टेल्स या वेबसाइटवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली होती. छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत संबंधित संकेतस्थळावर कठोर कारवाईची मागणी केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेटही घेतली होती. या सगळ्या घटनाक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ 'इंडिक टेल्स' वेबसाइटवर कारवाईचे निर्देश दिले होते. एकनाथ शिंदे यांनी आक्षेपार्ह मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थेने घेणे गरजेचे आहे. महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची हयगय करणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PVNa31f

No comments:

Post a Comment