रत्नागिरी: चिपळूण कराड मार्गावर दरम्यान वॅगनर आणि श्रेयस लकझरी बस मध्ये झालेल्या समोरा समोर झालेल्या भीषण अपघातात वॅगनर कार मधील एकाचा मृत्यू झाला आहे. वॅगनरमधून चिपळूण कापसाळ येथील एका लग्नाला जात असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा शुक्रवारी मध्यरात्री उशिरा हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात वॅगनर गाडी मधील पुणे येथील राजेंद्र चिंतू राऊत जागीच ठार झाले. वॅगनर मधील इतर तिघेजण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात हॉटेल निसर्ग समोर झाला.याबाबत सविस्तर वृत्त असे की पुण्यातील जैन हायस्कूल मधील एका शिक्षकाच्या मुलीचे लग्न कापसाळ येथे होते. त्यासाठी तिचे काही सहकारी पुण्याहून वॅगनआर गाडी क्रमांक एम एच १४..ईवाय ७६६३ घेऊन लग्नाला येत होते. प्रीतम तावरे हा गाडी चालवत होता तर त्याच्या पुढच्या सिटवर राजेंद्र राऊत बसले होते तर मागील सिटवर दादासाहेब अडसुळे,राजेश सोदा हे बसले होते. यावेळी गाडी कुंभार्ली घाट उतरून चिपळूण कडे येत असताना हॉटेल निसर्ग समोर रत्नागिरीहुन पुणे कडे जाणारी श्रेयस लक्झरी बस एमएच ११ एच ४७७६ ही गाडी समोरून आली आणि दोन्ही गाडीची समोरासमोर जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये एकाचा मृत्यू झाला. राजेंद्र राऊत यांच्या डोक्याला मोठा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दादासो अडसुले,राजेश सोदा,प्रीतम तावरे जखमी झाले अधिक उपचारासाठी चिपळूण येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, श्रेयस लक्झरीचा बस चालक निकेतन मंचेकर रत्नागिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र राऊत यांच्या मृतदेहाचे शविच्छेदन करून त्यांच्या नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. राजेंद्र राऊत यांचे वय ४५ होते. पुणे येथील जैन हायस्कूल मध्ये शिपाई होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा, भाऊ असा परिवार आहे. या सगळ्या अपघात प्रकरणाची नोंद शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Smpq2hU
No comments:
Post a Comment