नागपूर : फ्लॅट नावे न करून दिल्याने मुलाने जन्मदात्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी मुलगा त्याच्या पालकांना फ्लॅट माझ्याकडे हस्तांतरित करा अन्यथा जीवे मारण्याची धमकी देत होता. अखेर मुलाच्या छळाला कंटाळून वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वडिलांनी मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली.अमित अरबट असे आरोपी मुलाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलगा सतत दारू पिऊन तो आई-वडिलांशी भांडत होता. फ्लॅट आपल्या नावावर करून घेण्यासाठी त्याने वडिलांकडे तगादा लावला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.मिळालेल्या माहिती नुसार, अमित अरबट याला दारूचे व्यसन होते. तो सतत दारू पिऊन आई-वडिलांना मारहाण करायचा. फ्लॅट आपल्या नावावर करून घेण्यासाठी तो आई-वडिलांशी वाद घातला होता. फ्लॅट नावावर करून द्या, तसे न केल्यास तो आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत होता. अखेर मुलाच्या छळाला कंटाळून वडिलांनी नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अमित रात्री दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने आई-वडिलांना घराबाहेर पडण्यास सांगितले. फ्लॅट आपल्या नावावर करून द्यावा यासाठी त्याने शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. भांडणही झाले. मुलाचा त्रास खूप जास्त झाल्याचे वाटल्याने अखेर वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vCA75h0
No comments:
Post a Comment