नवी दिल्ली : मोहम्मद सिराजचं चाललंय तरी काय हा प्रश्न आता सर्वांना पडला असेल. कारण गेल्या सामन्यातही त्याने वाद केला होता. आता तर सिराज चक्क डेव्हिड वॉर्नरशी भिडल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.ही गोष्ट घडली ती पाचव्या षटकात. त्यावेळी सिराज गोलंदाजी करत होता आणि दिल्लीचा फिल सॉल्ट हा फलंदाज करत होता. त्यावेळी सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर सिराजच्या दुसऱ्या चेंडूवरही सॉल्टने षटकार लगावला. सिराजने तावाताने त्यानंतर तिसरा चेंडू टाकला. त्यावेळी सॉल्टने चौकार मारला. सिराजच्या तिन्ही चेंडूवर सॉल्टने मोठे फटके मारले होते. सिराज यावेळी चांगलाच भडकला होता. चौथा चेंडू टाकण्यासाठी सिराज सज्ज होता. सिराजने चेंडू टाकला आणि त्यावेळी सॉल्टने पंचांना हा चेंडू वाईड देण्याचा इशारा केला. त्यावेळी सिराज हा सॉल्टवर चांगलाच भडकला आणि त्याने तु तुझं काम कर, पंचांना त्याचं काम करू दे ... असं म्हणाला. त्यानंतर या दोघांमध्ये थोडा वाद रंगला. त्यावेळी दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरही तिथेच होता. वॉर्नर सिराजशी बोलायला गेला. त्यानंतर सिराज वॉर्नरबरोबरही भिडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता मैदानात मोठा राडा होणार, असे वाटत होते. पण त्यावेळी पंच आले आणि त्यांनी हे भांडण मिटवले, नाही तर पुन्हा एकदा मैदानात आरसीबीचा राडा पाहायला मिळाला असता. या सामन्यात जे काही घडलं त्याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरसीबी आणि राडा, हे समीकरण आता होत चालले आहे. कारण आरसीबीचा संघ मैदानात असला की राडा होतोच, असे आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चाहतेही त्यांच्यावर वैतागल्याचे पाहायला मिळत आहे. कारण जर प्रत्येक सामन्यात असे होत असेल तर चाहत्यांच्याही ते पचनी पडणार नाही. त्यामुळे आता चाहते या सामन्यानंतर पुन्हा एकदा आरसीबीला ट्रोल करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/EOiGFmw
No comments:
Post a Comment