Breaking

Saturday, May 27, 2023

अन्य धर्मीयासोबत फिरुन इस्लामचं नाक का कापतेस? तरुणीसोबत गैरवर्तन, ४०-५० तरुणांकडून मारहाण https://ift.tt/SRH7zJX

भोपाळ: मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. जवळपास ४० ते ५० तरुणांनी भररस्त्यात धुडघूस घातला. त्यांनी एका प्रेमी युगुलाला मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या लोकांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी गुंडगिरी करणाऱ्या तरुणांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. इंदूरमधील तुकोगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी भावेश सुनहरे त्याच्या सोबत शिक्षण घेणाऱ्या नसरीन सुल्तानाला घेऊन बस स्थानकाजवळ असलेल्या मदनी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला होता. दोघे हॉटेलमधून जेवून निघाले. तेव्हा ग्वालटोली परिसरात तरुणांच्या एका टोळक्यानं त्यांना अडवलं. टोळक्यानं भावेशकडे आधार कार्ड मागितलं आणि त्याला मारहाण करु लागले. नसरीननं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही या तरुणासोबत रात्री का फिरताय, असा सवाल तरुणांच्या टोळक्यानं मुस्लिम तरुणीला विचारला. त्यावर मी त्याच्यासोबत जेवायला गेले होते, असं उत्तर नसरीननं दिलं. जेवण ऑनलाईन ऑर्डर करायचं होतं, असा शहाजोग सल्ला तरुणांनी नसरीनला दिला. मुस्लिम नसलेल्या तरुणासोबत जेवायला जायची काय गरज होती? तुम्ही हिजाब परिधान करता, पण इस्लामचं पालन करत नाही. बुरखा घालून घरीच राहा, असं टोळक्यातील तरुणांनी तिला सुनावलं. दुसऱ्या धर्माच्या तरुणासोबत बाजारात फिरुन समाजाचं नाक कापताय. इस्लाम आणि शरियाचा कायदा लक्षात ठेवा. बुरखा परिधान करुनच घरातून निघा, असे सल्ले टोळक्यानं तरुणीला दिले. नसरीनसोबत असलेल्या भावेशनं तरुणांना विरोध करताच त्यांनी त्याला मारहाण सुरू केली. यावेळी तिथे ४० ते ५० जण जमले. त्यांच्यापासून स्वत:ला वाचवत नसरीन आणि भावेश धेनू मार्केटला गेले. तिथून बाल विनय मंदिर शाळेच्या दिशेनं पळून गेले. टोळकं तिथेही पोहोचले. त्यांनी दोघांना मारहाण करत राजकुमार पुलाजवळ नेलं. तिथे काही जणांनी तरुण, तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर टोळक्यानं चाकूनं हल्ला केला. दोन तरुणांना चाकू लागला. भावेशला गंभीर इजा झाली. त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/47UErL9

No comments:

Post a Comment