अहमदाबाद: चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल इतिहासात पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकत इतिहास रचला आहे. आयपीएलमध्ये ५ विजेतेपद पटकावण्याचा मान केवळ मुंबई इंडियन्सकडे होता पण आता चेन्नईने त्यांची बरोबरी केली आहे. अंतिम सामन्यात पावसाने खूप मोठं गोंधळ घातला, सामना आता गुजरातच्या पक्षातचं जातो की काय अशी भीती सर्वांनाच असताना चेन्नईने विजय मात्र आपल्या नावे केला आहे. जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत १ षटकार आणि १ चौकार मारत आपल्या संघाला आणि धोनीला मोठा विजय मिळवून दिला आहे. सामन्यानंतर जडेजा काय म्हणाला, पाहाचेन्नईचा संघ आता २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ अशी ५ जेतेपद आपल्या नावे करणारा संघ ठरला आहे. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना २१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण दुसऱ्या डावाचे ३ चेंडू टाकताच पाऊस आला आणि सामन्याचा रोख बदलला. मग सामना १५ षटकांचा झाला आणि १७१ धावांचे आव्हान चेन्नईसमोर ठेवले. पॉवरप्लेमध्ये ऋतुराज आणि कॉन्वेने शानदार सुरुवात करून दिली आणि नंतर शिवम दुबे, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे आणि मग विजयी चौकार लगावणाऱ्या जडेजाने संघाच्या विजयात मोलाची भूमिक बजावली. सामन्यातील विजयी चौकार लगावल्यानंतर जडेजाला धोनीने थेट उचलून घेतलं. हा क्षण सर्वच चाहत्यांसाठी खूप मोलाचा होतो. विजयानंतर जडेजा म्हणाला, "माझ्या घरच्या प्रेक्षकांसमोर गुजरातमधील या सर्वांसमोर पाचवे जेतेपद जिंकून खूप आनंद झाला आहे. मी स्वतः गुजरातचा आहे आणि त्यामुळे हि एक विशेष भावना आहे. उशिरापर्यंत पाऊस होता आणि तरी ही गर्दी पाऊस थांबण्याची वाट बघून इथे कायम होती; ही गर्दी खरंच आश्चर्यकारक आहे. आम्हाला सपोर्ट करणाऱ्या सर्व CSK च्या चाहत्यांचे खूप खूप अभिनंदन. मी हा विजय चेन्नई सुपर किंग्ज संघाचा खास सदस्य MS Dhoni ला समर्पित करतो आहे."सामन्यातील शेवटचे षटक सुरु होते तेव्हा तुझ्या मनात काय विचार होते, तू नेमका काय विचार करत होतास. यावर उत्तर देताना जडेजा म्हणाला, मी स्वतःला बॅक करत सरळ फटकेबाजी करू पाहत होती, उचलून मारण्याचा विचार माझ्या मनात होता. कारण मला माहित होतं मोहित स्लो बॉल टाकू शकतो."अशारितीने जडेजा मोहितच्या गोलंदाजीसाठी आधीच तयार होता आणि चेंडू येताच त्याने आपला प्लॅन आजमावत थेट चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पाठवली आणि चेन्नईने शेवटच्या दोन चेंडूंवर विजय साकारला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tMjFhUq
No comments:
Post a Comment