Breaking

Friday, May 26, 2023

मुंबईच्या विजयाचा हिरो बनायला गेला पण व्हिलन ठरला, सामना हातात असताना केली मोठी चूक https://ift.tt/t7W6lZb

अहमदाबाद : मुंबईने या सामन्यात शरणागती पत्करली नव्हती. या सामन्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा मुंबईचा संघ विजयाचे स्वप्न पाहत होता. त्यावेळी मुंबईचा एक खेळाडू यावेळी विजयाचा हिरो बनायला गेला पण तो पराभवाचा व्हिलन ठरला.गुजरातच्या २३४ धावांचा पाठलाग करत असताना मुंबईने दोन विकेट्स लवकर गमावले होते. मुंबईची २ बाद १७ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी हार मानली नाही. कारण त्यानंतर सूर्यकुमार यादवबरोबर तिलक वर्मा, कॅमेरून ग्रीन यांनी दमदार भागीदाऱ्या रचल्या होत्या आणि संघाचे आव्हान जीवंत ठेवले होते. तिलक वर्मा यावेळी ४३ धावांवर बाद झाला. त्यानंतर ग्रीन फलंदाजीला आला आणि त्यानेही दमदार फटकेबाजी केली. ग्रीनने यावेळी ३० धावा केल्या. त्यानंतरही सूर्या हा संघासाठी लढत होता. सूर्याने यावेळी दमदार फटकेबाजी करत संघाचे आव्हान जीवंत ठेवले होते. सूर्याने यावेळी अर्धशतकही पूर्ण केले आणि त्यानंतर तो आता मोठी खेळी साकारणार असे वाटत होते. सूर्या यावेळी मुंबईच्या विजयाचा हिरो ठरेल, असे सर्वांना वाटत होते. पण यावेळी सूर्याने घात केला. आतापर्यंत जो फटका त्याला या सामन्यात चांगल्या पद्धतीने खेळता आला नव्हता तोच स्कुपचा फटका तो मारायला गेला आणि बाद झाला. सूर्या जिथे बाद झाला तिथेच हा सामना फिरला. त्यामुळे सूर्या हा खरं तर मुंबईच्या विजयाचा नायक ठरला असता. पण यावेळी तो मुबंईच्या पराभवाचा व्हिलन ठरल्याचे पाहायला मिळाले. दर्जेदार गोलंदाज नसल्याचा फटका बसला अन् मुंबई इंडियन्सला यंदा आयपीएल टी-२० स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत झेप घेता आली नाही. शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या दुसऱ्या क्रमांकांच्या ‘क्वालिफायर’मध्ये गुजरात टायटन्सने मुंबईवर ६२ धावांनी मात करत अंतिम फेरीत धडक मारली. रविवारी रंगणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत हार्दिक पंड्याच्या गुजरातपुढे आव्हान असेल ते महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जचे. निष्प्रभ मारा, पोषक खेळपट्टी अन् त्याहीपेक्षा अंगभूत कौशल्याच्या जोरावर गुजरातच्या शुभमन गिलने १२९ धावांची खेळी करत मुंबईच्या आव्हानातील हवा काढून टाकली. ज्यामुळे प्रथम फलंदाजी करत गुजरातने ३ बाद २३३ धावांचा डोंगर उभारत अर्धी लढाई जिंकली. या पायाभरणीवर गुजरातच्या गोलंदाजांनी विजयी कळस चढविला. मोहम्मद शमीने रोहित शर्मा आणि नेहल वढेरा या सलामीच्या जोडीला झटपट गुंडाळून मुंबईला हादरले. तर मोहित शर्माने अवघ्या दहा धावांत मुंबईचा निम्मा संघ गुंडाळत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सूर्यकुमार यादव (६१), तिलक वर्मा (४३) यांनी फलंदाजीची सुरुवात बरी केली; पण त्याच्या खेळीलाही मर्यादाच आल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZMXUOSL

No comments:

Post a Comment