Breaking

Wednesday, May 17, 2023

भाईगिरी पडली महागात; चारचाकीच्या बोनेटवर बसून फिरत होता, पोलिसांनी अशी घडवली अद्दल https://ift.tt/UDSVd2t

: जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात चालचाकीच्या बोनेटवर बसून हा व्हिडिओ जळगावचा या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चार चाकीच्या बोनेटवर बसून करणाऱ्या या तरुणाला रामानंदनगर पोलिसांनी कारवाई करत चांगलीच अद्दल घडवली असून या तरुणाने बुधवार १७ मे रोजी माफी मागितली. त्याचा हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान या प्रकाराची जळगाव शहरात मोठी चर्चा रंगली आहे.जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातून फिरताना काही तरुणांनी चार चाकी च्या बोनेटवर बसलेल्या एकाचा व्हिडिओ तयार केला. त्या व्हिडिओवर 'जळगावचा मन्या सुर्वे' असा मजकूर लिहून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. तसेच त्याला चांगली अद्दल घडवून यापुढे असे कुठलेही कृत्य करणार नाही असा तरुणाचा बोलताना चा व्हिडिओ तयार केला व तो सोशल मीडियावर व्हायरल केला. अशाप्रकारे दहशत वाजवण्याच्या उद्देशाने वाहनावर बसून व्हिडिओ तयार करणे हे बेकायदेशीर बाब असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या बरोबरच अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/cbG13m7

No comments:

Post a Comment