Breaking

Wednesday, May 17, 2023

Karnataka CM : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुणाला संधी? मल्लिकार्जून खरगेंनी तिढा सोडवला, शपथविधीची तारीख ठरली https://ift.tt/8sKhn5N

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं १३५ जागांसह सत्ता खेचून आणली होती. भाजपला ६६ तर जेडीएसला १९ जागांवर यश मिळालं होतं. काँग्रेसच्या आमदारांची बैठक बंगळुरुमध्ये पार पडली होती. त्या बैठकीत आमदारांनी मुख्यमंत्री निवडीचे सर्वाधिकार पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना दिले होते. १३ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरु होती. काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत बैठकांचं सत्र सुरु होतं. अखेर कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर सर्वांना मिळालं आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री म्हणून यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तर, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के.शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येईल, अशी सूत्रांनी माहिती दिल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज सायंकाळी ७ वाजता बंगळुरू मध्ये बैठक पार पडणार आहे. आमदारांना या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आलं आहे. बुधवारी दिवसभर मल्लिकार्जुन खरगे यांचं नवी दिल्लीत बैठकांचं सत्र सुरु होतं, अखेर मध्यरात्री प्रश्न सोडवण्यात त्यांना यश आलं आहे. कर्नाटक मध्ये नव्या सरकारचा शपथविधी २० मे रोजी होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.दिवसभर झालेल्या चर्चेनंतर अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद विभागून घेण्याच्या मुद्द्यावर देखील चर्चा झाली. मात्र, डी. के.शिवकुमार पहिल्या अडीच वर्षांसाठी आग्रही होते अशी माहिती होती. मात्र, अखेर रात्री उशिरा कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा पेच सोडवण्यात मल्लिकार्जुन खरगे यांना यश आलं आहे.

काँग्रेसचा सामूहिक नेतृत्वाचा प्रयत्न

नव्या सरकारच्या स्थापनेवेळी केवळ एक किंवा दोन नेत्यांचा शपथविधी होऊ नये अशी काँग्रेस नेतृत्त्वाची इच्छा होती. निवडणूक सामूहिक नेतृत्वाखाली जिंकल्यानं कृती देखील सामूहिक असली पाहिजे यासाठी पक्षाकडून सावध पाऊलं टाकली जात होती. आता २० मे रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेस सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार यांच्यासह अन्य किती मंत्र्यांचा शपथ देणार हे पाहावं लागेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nhGDWCk

No comments:

Post a Comment