Breaking

Tuesday, May 16, 2023

गौतमी पाटीलला जिल्हा बंदी करा, तिच्यावर गुन्हा दाखल करा; या राजकीय पक्षाने केली मागणी https://ift.tt/uUJmdyQ

नाशिक : नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या यांच्या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत असून गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करून तिला नाशिक जिल्हा बंदी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.नृत्य कलाकार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे नाशिक शहरात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना येथील मद्यपी कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामुळे यामध्ये पत्रकारांना गंभीर दुखापत झाली. या घटनेसाठी सर्वस्वी गौतमी पाटीलला जबाबदार धरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नाशिकमध्ये असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी नाशिक जिल्ह्यात गौतमी पाटीलला पूर्णतः बंदी घालण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे. नाशिकमध्ये काय घडले ?नाशिकमध्ये नर्तकी गौतमी पाटीलचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात हुल्लडबाजांनी एकच गोंधळ घालत मीडियावर हल्ला केला. या मारहाणीत अनेक फोटोग्राफर आणि कॅमेरामन जखमी झाले आहेत.पोलिसांनी आक्रमक झालेल्या हुल्लडबाजांना आवर घातला. ही हुल्लडबाजी झाल्यानंतरही गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम सुरूच होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Nv4wGUh

No comments:

Post a Comment