Breaking

Sunday, May 21, 2023

रविवारची सुट्टी एन्जॉय करणे जीवावर बेतले, ५ मित्र तापी नदीत पोहायला गेले, तिघेच घरी परतले https://ift.tt/XSLJODR

: रविवारच्या सुट्टीचा आनंद उद्यासाठी पाच मित्र तापी नदीत पोहायला गेले. यादरम्यान दोन जणांचा तापी झाल्याची दुर्दैवी घटना शहरातील राहुल नगर भागातील पात्रात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. शेख दानीश शेख जाबीर (१७, रा.ग्रीन पार्क, ३२ खोली, भुसावळ) व अंकुश दौलत ठाकूर (१७, ग्रीन पार्क, ३२ खोली, भुसावळ) अशी मृतांची नावे आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.भुसावळ शहरातील खडका रोड ग्रीन पार्क भागातील पाच तरुण रविवारी सुटीनिमित्त तसेच वाढत्या तापमानामुळे उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून शहरातील राहुल नगर भागातील तापी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. पोहताना काही जण नदीच्या काठावर पोहत होते, तर दोन जण तापी नदी पात्रात मध्ये शिरले. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने शेख दानीश व अंकुश ठाकूर हे दोघे जण तापी नदीच्या पात्रात खोल भागात बुडाले. सुदैवाने तिघे काठावरच पोहत असल्याने बचावलीसुदैवाने तिघे काठावरच पाण्यात पोहत असल्याने बचावले. काठावर असलेल्या तिघा मित्रांना दानीश व अंकुश हे दोघे बुडताना दिसले. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र दोघेही पाण्यातून वर आले नाहीत. मदत मिळेपर्यंत उशीर झाला होता. दोघे बुडाले होते. पट्टीच्या पोहणार्‍यांनी दोघांना बाहेर काढले. तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर मुलांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. या ठिकाणी मुलांच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनीही घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.तापी नदी पात्रात गेल्या काही दिवसांमध्ये मुलांचा बुडून मृत्यू झालेल्या च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सध्या तापमानाचा पारा वाढल्यामुळे प्रचंड उकडाचा त्रास होत आहे व याच उकड्याच्या त्रासापासून काही प्रमाणात दिलासा मिळावा म्हणून तरुण तापी नदीपात्रात पोहण्यासाठी जातात. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने पोहण्यासाठी येणाऱ्या मुलांचा बुडून मृत्यूची दुर्घटना घडते. दरम्यान एकाच घटनेत दोन मुलं बुडाल्याच्या या घटनेने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/q54DQUG

No comments:

Post a Comment