Breaking

Sunday, May 21, 2023

मुंबईला विराट भिडला पण शुभमन गिल मदतीला आला, RCB पुन्हा एकदा प्ले ऑफपासून वंचित https://ift.tt/Adowr9C

बेंगळुरू : आयपीएलच्या प्लेऑफमध्ये सर्वप्रथम धडकलेल्या गुजरात टायटन्सने आज आरसीबीला जबरदस्त धक्का दिला. गुजरातच्या शुभमन गिलने तुफानी शतकी खेळी करत आरसीबी आणि विराट कोहलीच्या स्वप्नांवर पाणी फेरलं. शुभमन गिलच्या फलंदाजीने मुंबई इंडियन्सला प्लेऑफची लॉटरी लागली. मुंबई प्लेऑफमध्ये गेली. यामुळे आरसीबीचा पराभव झाल्याचा सर्वाधिक आनंद हा मुंबई इंडियन्सल आणि मुंबईच्या चाहत्यांना झाला असेल. गुजरातविरोधात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत १९८ धावांचं लक्ष्य ठेवलं. यात विराट कोहलीचं धडाकेबाज शतकही होतं. सामन्यात विराट मैदानात उतरलाच मोठ्या खेळीच्या इराद्याने. विराटने शतकी खेळी केलीही. विराटने या सामन्यात ३५ चेंडूत अर्धशतक तर ६० चेंडूत शतक झळकवलं. विराट या सामन्यातही नाबाद राहिला. विराटला फाफ डु प्लेसिस आणि मॅक्सेल यांनी साथ दिली. विराटने फलंदाजीवेळी आरसीबीची एक बाजू लावून धरली. आरसीबीची धावसंख्या २०० च्या जवळ नेऊन ठेवली. विराटने १३ चौकार आणि १ षटकार लगावला. आरसीबीने विराटच्या शतकाच्या जोरावर ५ गडी गमवत १९७ धावा केल्या. आरसीबी मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरली होती. फलंदाजीनंतर गुजरातविरोधात फिल्डींग आणि गोलंदाजीही चांगली केली. पण शुभमन गिलही मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठीच मैदानात उतरला, असंच वाटत होतं. शुभमन गिल यांनी तडाखेबाज फलंदाजी केली. शुभमन गिल याने ५२ चेंडूत शतक झळकावलं. शुभमन गिलच्या या शतकाच्या जोरावर गुजरातने तगडा संघ असलेल्या आरसीबीवर विजय मिळवला. विराटने सलग दोन सामन्यात शतक झळकवलं. तर शुभमन गिलने आयपीएलमधलं दुसरं शतक केलं. गिलने ५२ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकांसह शतक झळकावलं. गुजरातला ६ गडी राखून विजय मिळवून दिला. सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिल हे दोन्ही चांगले खेळले. पण या सामन्यातील पराभवामुळे आरसीबी बाहेर गेली. यामुळे आयपीएलमधील प्लेऑफमध्ये जाण्याचा आणि आयपीएल जिंकण्याचं आरसीबीचं आणि विराट कोहलीचं स्वप्न भंगलं. आयपीएलमधून आरसीबी बाहेर गेल्याने विराटच्या चेहऱ्यावर सामन्यानंतर निराशा दिसून आली. विराटने शतकी खेळी केली, पण आरसीबीला विजय मिळवता आला नाही. प्लेऑफमध्ये कोणते संघ गेले? गुजरात जायंट्स, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे चार संघ प्लेऑफमध्ये दाखल झाले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/No7xCGZ

No comments:

Post a Comment