Breaking

Saturday, May 13, 2023

नांदेडमध्ये उष्मघाताचा पहिला बळी, २८ वर्षीय युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, हृदयविकाराचा झटकाही आला https://ift.tt/ycI9r2M

: दिवसभर उन्हात शेतातील कामे आटोपून घरी परतलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा उष्मघात आणि त्यानंतर हृदय विकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाला. विशाल रामराव मादसवार असं या तरुणाचं असून तो हिमायतनगर शहरातील रहिवासी आहे. उष्मघाताने बळी गेल्याने हिमायतनगर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.सद्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. दररोज तापमाणात वाढ होतं आहे. अशा उन्हातच शुक्रवारी विशाल मादसवार हा शेताकडे गेला होता. भर उन्हात त्याने शेतीची कामे केली. दिवसभर शेतीची कामे आटोपून तो सायंकाळी ६ वाजे च्या सुमारास घरी परतला. उन्हात काम केल्याने त्याला अत्यवस्थ वाटू लागले. त्याने ही गोष्ट घरच्यांना न सांगता तो झोपी गेला. शनिवारी सकाळी त्याची तब्येत आणखी बिघडली. नांदेडमध्ये उष्माघाताचा पहिला बळीउलटी झाल्याने कुटुंबीयांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र नियतीने घात केला आणि ह्रदयविकाराचा हलका झटका आल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यात उष्मघाताने हा पहिला बळी गेला आहे.अर्धांगवायू आलेल्या पित्याची सेवा ठरली शेवटचीमृत विशाल याचे वडील रामराव मादसवार हे सेवानिवृत्त मलेरिया डॉक्टर होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. शेतातून आल्यानंतर विशाल हा आपल्या वडिलांची सेवा करायचा. गुरुवारी देखील उन्हामुळे अत्यव्यस्त वाटत असताना देखील त्याने आपल्या वडिलांची सेवा केली. मात्र ही सेवा शेवटची ठरेल हे कोणालाच माहिती नसेल. या घटनेनंतर कुटुंबीयांवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जिल्ह्यात या वर्षीचा सर्वाधिक तापमानाची नोंदअवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणानंतर आता पुन्हा उन्हाचा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. शनिवारी नांदेडमध्ये कमाल तापमान हे ४३. २ अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलंय. या वर्षीचे हे सर्वाधिक तापमान आहे. या वाढलेल्या उष्णतेमुळे नांदेडमध्ये दिवसा रस्ते निर्मनुष्य बनले आहेत. वाढत्या तापमानामुळे नांदेडकरांना उन्हाच्या झळा आणि उकड्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, उन्हापासून खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KHChEI0

No comments:

Post a Comment