
नवी दिल्ली : आयपीएलमध्ये आज दोन सामने झाले. चार संघ मैदानात उतरले होते. पण यावेळी दोन संघांचे आव्हान संपुष्टात आल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर या दोन सामन्यांसह दोन संघांचे आव्हान या आयपीएलमधील संपल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुणतालिकेत आता मोठे बदल झाले आहेत.शनिवारी गुणतालिकेत मोठे बदल झाल्याचे पाहयला मिळाले. कारण दोन संघ जरी स्पर्धेबाहेर गेले असले तरी दोन संघांचे गुण वाढले आहेत आणि त्यामुळे गुणतालिकेचे समीकरण अजूनच रंगतदार झाले आहे. कारण या सामन्यापूर्वी पंजाब किंग्सच्या संघाचे १० गुण होते आणि ते आठव्या स्थानावर होते. पण या सामन्यात पंजाबच्या संघाने मोठा विजय साकारला. या विजयासह पंजाबच्या संघाने दोन गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे पंजाबच्या संघाचे आता १२ गुण झाले आहेत. त्यामुळे आठव्या स्थानावरील पंजाबचा संघ आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. गुणतालिकेत पंजाब आणि राजस्थान या दोन्ही संघांचे आता १२ गुण असतील. त्यामुळे प्ले ऑफते गणित आता चांगलेच रंगणार आहे. या सामन्यानंतर दिल्लीचा संघ आता स्पर्धेबाहेर गेला आहे.लखनौने आजच्या पहिल्या सामन्यात हैदराबादवर विजय साकारला. या सामन्यापूर्वी ११ सामन्यांत त्यांचे ११ गुण होते. पण १२ व्या सामन्यात त्यांनी विजय साकारला आणि त्यांचे आता १३ गुण झाले आहेत. या १३ गुणांसह आता लखनौच्या संघाने राजस्थानला पिछाडीवर ढकलले आहे आणि त्यांनी गुणतालिकेतील चौथे स्थान मिळवले आहे. त्यामुळे ते प्ले ऑफच्या दिशेने जासत असल्याचे आता समोर येत आहे. उर्वरीत दोन्ही सामने जर त्यांनी जिंकले तर ते आता प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. त्यामुळे आता आयपीएलच्या प्ले ऑफसाठी आठ संघांमध्ये शर्यत असेल. दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्याबरोबर सनरायझर्स हैदराबादचा संघ आता आयपीएलच्या बाहेर पडले आहेत.आयपीएलमध्ये आता प्ले ऑफची शर्यत चांगलीच रंगतदार होत चालली आहे. दोन संघ तर आता या शर्यतीमधून बाहेर पडले आहेत पण आठ संघांमध्ये आता शर्यत पाहायला मिळेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DqfMCHx
No comments:
Post a Comment