Breaking

Wednesday, May 24, 2023

Nagpur Crime: घरामागील टेकडीवर कुख्यात गुंडाचा मृतदेह, डोक्यावर-चेहऱ्यावर जखमा, नागपुरात खळबळ https://ift.tt/NQ58X0C

नागपूर: नागपूर एमआयडीसी परिसरात कुख्यात गुंडाचा मृतदेह राजीवनगर हिंगणा जवळील टेकडीवर आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी त्याच्या डोक्यावर आणि गालावर झालेल्या जखमांच्या खुणा पाहता त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी ही घटना उघडकीस आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २२ वर्षीय चंदन शिवकुमार शहा (रा. कार्तिकनगर गजानन नगर, हिंगणा रोड, नागपूर) असे मृताचे नाव आहे. चंदन हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. जेवण आटोपून तो सोमवारी तो रात्री दहाच्या सुमारास राजीव नगर भागातील पानटपरीवर आला. त्यानंतर मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृतदेह गजानन नगर आणि राजीव नगरच्या पाठीमागील टेकडीवर आढळून आला.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक (गुन्हे) मुकुंद कवडे, उपनिरीक्षक संतोष रामलोड, विकास जाधव, सहायक पोलीस अधिकारी नितीन जावळेकर आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हिंगणा शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पोलिस ठाण्याचे अध्यक्ष मुकुंद कवाडे यांनी सांगितल्यानुसार, घटनेचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. लहानपणापासूनच गुन्हेगारांच्या टोळीत सामीलपोलिसांनी सांगितल्यानुसार चंदनवर दरोडा, मारहाण, चोरी आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो लहानपणापासूनच गुन्हेगारांच्या टोळीत सामील होता. २०११ मध्ये या टेकडीवर एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. तीन ते चार जणांनी या तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, या हत्येचा आरोपी चंदन होता. त्याच्या डोक्यावर आणि गालावरच्या जखमा आणि त्याचा रक्ताने माखलेला चेहरा पाहता, त्याला काही गुन्हेगारांनी परस्पर वैमनस्यातून मारले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aSFv65k

No comments:

Post a Comment