Breaking

Thursday, June 15, 2023

Gautami Patil: अपसर यतय! गतम पटलच जलव नदडमधय पहलयदच दसणर तरणमधय उतसह https://ift.tt/8YwgS27

नांदेड : आपल्या लावणीने तरुणाईला भुरळ घालणारी आणि नेहमी चर्चेत राहणारी 'सबसे कातीलट गौतमी पाटीलच्या लावणीचा जलवा आता नांदेड मध्ये दिसणार आहे. येत्या शनिवारी जिल्हातील धर्माबाद तालुक्यात गौतमीचा लावणीचा कार्यक्रम होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख आकाश रेड्डी यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजता धर्माबाद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदान परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आनंद जाधव, खासदार हेमंत पाटील, जिल्हा प्रमुख आनंद बोढारकर यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सध्या आपल्या लावणीमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. तिच्या अदाकारीची तरुणाईमध्ये मोठी क्रेज देखील आहे. प्रत्येक कार्यक्रमाला तरुणाईची मोठी असते. त्यांनी आजपर्यंत केलेल्या लावणीच्या कार्यक्रमात तरुणाईने धिंगाणा घातल्याने अनेक वेळा गौतमी यांचा कार्यक्रम चर्चेत आला होता. दरम्यान नांदेडमध्ये पहिल्यांदाच गौतमी पाटीलचा कर्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पहिल्यांदाच होतोय गौतमीचा नांदेडमध्ये पहिल्यांदा कार्यक्रम होत असल्याने तरुणाईमध्ये उत्साह आहे. कार्यक्रमादरम्यान काही गोंधळ होऊ नये यासाठी आयोजकांकडून खबरदारी देखील घेतली जात आहे. पोलिसांची होणार दमछाकगौतमी पाटीलचे आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यात लावणीचे कार्यक्रम पार पडलेत. सर्वच कार्यक्रमात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाते. गौतमी यांची लावणीची अदाकारी त्यास मिळणारा प्रतिसाद यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढवणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार त्या ठिकाणची जागा पुरेल का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. मागील अनेक कार्यक्रमात झालेल्या गोंधळामुळे नांदेड पोलिसांना मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी व्हिडिओ चित्रीकरण, ड्रोनची मदत घ्यावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/iLEAVTb

No comments:

Post a Comment