म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समाजमाध्यमावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. दरम्यान, लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.एका ट्विटर हँडलवरून आणि फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांच्याविषयी भाष्य करण्यात आले आहे. यापैकी फेसबुकवरील नर्मदाबाई पटवर्धन नावाच्या पेजवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून, 'तुझा लवकरच दाभोलकर होणार,' अशी धमकी देण्यात आलेली आहे. तर, सौरभ पिंपळकर या ट्विटर हँडलवरून शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा असलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन्ही ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या मजुकराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या संदर्भात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून यासाठी सायबर पोलिसांचीही मदत घेतली जात आहे.संजय राऊत यांनाही धमकीशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनाही फोनद्वारे धमकी देण्यात आली आहे. त्यांनी फोन न घेतल्याने त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना फोन करून धमकावण्यात आले. या प्रकरणातही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/gVQrvM1
No comments:
Post a Comment