Breaking

Friday, June 9, 2023

धक्कादायक! तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मनोज सानेने घेतला गुगलचा आधार https://ift.tt/t7FcKLX

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मिरा रोड येथील महिलेच्या निर्घृण हत्या प्रकरणात आता नवीन माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी मनोज साने याने गुगलचा आधार घेत माहिती मिळवल्याचे समोर आले आहे. याव्यतिरिक्त तो चौकशीदरम्यान वेगवेगळी माहिती देत पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे निष्पन्न झाले असून या दोघांचे नातेवाईकही आता पुढे आले आहेत.मिरा रोडच्या गीता नगर परिसरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या मनोज साने याने सरस्वती वैद्य हिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. इतकेच नव्हे तर ते तुकडे त्याने कुकरमध्ये शिजवल्याचे तपासात उघड झाले. हे कृत्य करण्यापूर्वी मनोजने मृतदेहाची काही छायाचित्रेही काढली होती. याशिवाय मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये यासाठी, तसेच त्याची विल्हेवाट लावण्यासाठी काय करावे ही माहिती मिळवण्यासाठी त्याने गुगलचा आधार घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.आरोपी मनोज याने याआधी दोघेही अनाथ असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र, मनोजचे काका व इतर नातेवाईक बोरिवली परिसरात राहत असल्याचे समोर आले आहे. सरस्वतीलाही पाच बहिणी असून त्यातील एक बहीण आता पोलिसांसमोर आली आहे. मनोज व सरस्वतीने तिच्या एका बहिणीच्या घरी जाऊन जेवणही केले होते. आरोपीने प्रथम आपण लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे सांगितले होते. मात्र, दोघांनी एका मंदिरात विवाह केल्याची माहिती मनोजने आता पोलिसांना दिली आहे.या दोघांची ओळख सन २०१२मध्ये सरस्वती नोकरीच्या शोधात असताना, बोरिवली परिसरात झाली होती. त्याआधी ती तिच्या बहिणीकडे राहायला होती. तत्पूर्वी ती अहमदनगर येथील आपटे अनाथ आश्रमात राहायला होती. या आश्रमात काही कागदपत्रे घेण्यासाठी सरस्वती मधल्या काळात गेली होती. यावेळेस तिने मनोजची ओळख मामा अशी तेथील लोकांना करून दिली होती. दोघेही मूळचे अहमदनगरचे असल्याने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. पोलिसांना नेहमी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देत आरोपी मनोज पोलिसांना गुंगारा देत आहे. सरस्वतीची हत्या केल्याची कबुली त्याने अद्याप दिलेली नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Q6PHu4Y

No comments:

Post a Comment