नांदेड: सबसे कातिल गौतमी पाटील म्हणून प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटीलचा शो पुन्हा चर्चेचा ठरला. प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे गौतमी पाटीलला अवघ्या दहा मिनिटातच कार्यक्रम बंद करावं लागलं. तर प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सोम्य लाठीमार देखील करावा लागला. या अर्धवट कार्यक्रमामुळे आयोजकांसह प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळाली. जिल्ह्यातील धर्माबाद शहरात शनिवारी रात्री या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख आकाश रेड्डी यांच्या वतीने नांदेडमध्ये पहिल्यांदा गौतमी पाटीलच्या लावणीचे आयोजन करण्यात आलं होतं. गौतमी पाटील येणार म्हणून कार्यक्रम स्थळी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. तर गौतमीला पाहण्यासाठी आलेल्या महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी सहा वाजताची होती, पण रात्री नऊ वाजता गौतमी पाटीलच स्टेजवर आगमन झालं. यावेळी स्टेज जवळ येताच तिच्या चाहत्यांनी गोंधळ सुरु केला. गौतमीला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी लाकडी बॅरिगेट्स तोडून स्टेज जवळ गर्दी केली होती. या प्रचंड गर्दीत ही गौतमी पाटीलने मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले. मात्र, तिच्या चाहत्यांनी गोंधळ सुरु केला. एवढंच नाही तर खुर्च्यांची देखील तोडफोड केली. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला होता. हा गोंधळ पाहून गौतमी पाटीलला अवघ्या दहा मिनिटातचं कार्यक्रम बंद करावं लागलं. केवळ दीड गाण्यावर नृत्य सादर करुन तिने स्टेज सोडलं .गौतमी पाटील कडून प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहनगौमती पाटीलच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. आयोजकांकडून प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केलं जातं होतं. तरीही प्रेक्षकांचा गोंधळ सुरूच होता. शेवटी गौतमी पाटील हिने स्वतः हातात माईक घेऊन प्रेक्षकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. आम्ही एवढ्या दुरून आलोत, सुखरूप कार्यक्रम पार पाडा असे आवाहन देखील तिने केले. मात्र, प्रेक्षकांचा गोंधळ काही थांबला नाही. शेवटी गौतमी पाटीलने स्वतःहून शो बंद केला. पोलिसांची पुन्हा दमछाक गौतमी पाटील नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदा येणार असल्याने तरुणाईने मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम सुरु होताच प्रेक्षकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. एवढचं नाही तर खुर्च्यांची तोडफोड देखील केली. प्रेक्षकांची ही हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलिसांची मोठी दमछाक झाली. पोलिसांना सोम्य लाठीमार देखील करावा लागला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/mnE1H64
No comments:
Post a Comment