Breaking

Saturday, June 17, 2023

घर खरदबबत आनदच बतम: नवय परकलपच रटग तपसण हणर सप महररच मठ नरणय https://ift.tt/XWTnD8I

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईसह राज्यभरातील कोणत्याही गृहनिर्माण प्रकल्पाची योग्यता ठरविण्याचे मोठे आव्हान ग्राहकांसमोर असते. ही पद्धत अधिक सुलभ, सोपी, समजण्याजोगी होण्यासाठी महारेराने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. काही निर्धारित निकषांच्या आधारे ग्राहकांना प्रकल्पांचे मानांकन ठरविणे सोपे ठरणार आहे. जानेवारी २०२३पासून नोंदणीकृत झालेल्या प्रकल्पांसाठी ही पद्धत लागू होणार आहे. त्यातून, ग्राहकांना उपलब्ध होणाऱ्या सर्व माहितीच्या आधारे प्रकल्पांचे मानांकन ठरविता येऊ शकेल. याबाबत महारेराने समग्र सल्लामसलत पेपर तयार केला असून तो वेबसाइटवर उपलब्ध केला आहे. त्याविषयी, १५ जुलैपूर्वी सूचना, हरकती मागविण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे प्रकल्पांचे मानांकन ठरविण्याची पद्धत अवलंबणारे महारेरा देशातील पहिले प्राधिकरण ठरले आहे.महारेराने ग्राहकांच्या अनुषंगाने विविध निर्णय घेतले असून त्यामध्ये गृहनिर्माण प्रकल्पाचे मानांकन ठरविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महारेराच्या निर्णयानुसार जानेवारी २०२३नंतर नोंदणीकृत झालेल्या प्रकल्पांसाठी ही पद्धत लागू केली जाणार आहे. १ ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ कालावधीतील माहितीच्या आधारे पहिले मानांकन २० एप्रिल २०२४पासून उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने महारेराचा प्रयत्न आहे. ही संपूर्ण पद्धत पारदर्शक होण्याची काळजी घेताना ती टप्प्याटप्प्याने अंमलात आणली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.महारेराने १ ऑगस्टपासून ग्राहकांना सक्षम करण्यासाठी यापूर्वीच प्रकल्पांची सर्व माहिती असलेले क्यूआर कोड सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत वापरण्याचे विकासकांना बंधनकारक केले आहे. ग्राहकांना मानांकन ठरविता यावे, यासाठी उपलब्ध माहितीच्या आधारे दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात प्रकल्पाच्या चार महत्त्वाच्या तरतुदी जाहीर केल्या जातील. यात ढोबळमानाने प्रकल्पाचा आढावा, तांत्रिक, आर्थिक आणि कायदेविषयक माहितीचे तपशील असतील. ही माहिती सार्वजनिकरित्या ग्राहकांना उपलब्ध राहील. २० एप्रिल २०२४पासून ते सार्वजनिक केले जाईल.मानांकन ठरविताना कोणते घटक?- प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता, सक्षम यंत्रणेच्या तांत्रिक मंजुरी, प्रकल्पांवरील सुरू असलेले खटले, महारेराच्या वेबसाइटवर विविध आवश्यक अहवाल योग्य पद्धतीने पुरविले जाणे आदी.- पहिल्या टप्प्यात प्रकल्पाच्या वस्तुनिष्ठ माहितीचा समावेश अपेक्षित.- प्रकल्पाच्या तपशीलात ठिकाण, विकासक, सोयी सुविधा आदी.- तांत्रिक तपशीलामध्ये प्रारंभ प्रमाणपत्र (सीसी), तिमाही, वार्षिक अनुपालन अहवाल, नोंदणी किती टक्के झाली, प्रकल्प पूर्ण झाल्यास सोसायटी झाली का? आदी- वित्तीय तपशीलात आर्थिक भार, प्रकल्पाची वित्तीय प्रगती, वार्षिक अंकेक्षण प्रमाणपत्र आदी.- कायदेशीर तपशीलांमध्ये प्रकल्प विरोधातील खटले, तक्रारी, महारेराने जारी केलेले वॉरंट आदी सार्वजनिकरित्या उपलब्ध राहतील, हे पाहिले जाईल. .१५ जुलैपूर्वी सूचना, हरकतीमहारेराने यासंदर्भात सूचना, हरकती, मते १५ जुलैपूर्वी suggestions.maharera@gmail.com येथे पाठविण्याचे आवाहन केले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/WhdQaDI

No comments:

Post a Comment