Breaking

Thursday, June 1, 2023

भंडाऱ्यात अनोखा विवाहसोहळा; नवरीची धमाकेदार एन्ट्री, संविधानाची शपथ घेऊन बांधली लग्नगाठ, सर्वत्र होतंय कौतुक https://ift.tt/DaOGq2Y

: लग्न हे जीवनात एकदाच होत असत, म्हणून प्रत्येकाला वाटत की ते खास असावं. हल्ली हटके पद्धतीने लग्नसोहळा करण्याकडे तरुणांचा कल असतो. कुणी आकाशात लगीनगाठ बांधतं, कुणी पाण्यात. देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्नात सात फेरे घेतले जातात. मात्र असं काहीच न करता एका नवदाम्पत्याने संविधानाची शपथ घेऊन लग्न केलं. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात हा अनोखा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या आदर्श विवाह सोहळ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.संविधान हातात घेऊन नवरीची एंट्रीअलीकडे विवाह मंडपात पाहुण्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनोखी शक्कल लढवली जाते. त्यासाठी बक्कळ पैसा उडविला जातो. मात्र, या विवाह सोहळ्यात असा प्रकार नसला तरीही चर्चा मात्र जोमात आहे. नवरीनं विवाह समारंभात चक्क हातात घेऊन वाजत गाजत खास एन्ट्री केली आणि उपस्थित पाहुण्या मंडळीचं मनं जिंकून घेतलं. नवदाम्पत्यानं भारतीय संविधानाला साक्षी मानून विवाह केलालाखनी तालुक्याच्या पोहरा गावातील तरुणी प्रांजल धनराज बडोले हिचा विवाह अमरावती जिल्ह्यातील पंकज धनराज पाटील यांच्याशी जुळला. दोघेही पत्रकार आहेत. विचाराने प्रगल्भ असलेल्या या नवविवाहीत दाम्पत्यानं भारतीय संविधानाला साक्षी मानून आदर्श विवाह पार पाडण्याचा विचार केला आणि तो अमलातही आणला. तथागत गौतम बुध्द आणि भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून विवाह सोहळ्याला सुरुवात केली. त्यानंतर भारतीय संविधानाला साक्षी मानून स्वातंत्र्य, समता, आणि बंधूता या संविधानिक तत्वप्रणालीचा अंगीकार करत सध्द्म्मात जिवन जगण्याचा संकल्प देखील त्यांनी केलाय. विवाहचं सर्वत्र कौतुकया विवाह सोहळ्याचं एक खास आकर्षण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्ही. एस. कर्डक यांना आदर्श बौध्द विवाह समारंभ कसा असावा, यासंदर्भात ४ डिसेंबर १९५६ मध्ये पत्र लिहीलं होतं. त्याच पत्राला उद्देशून या आदर्श विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं. या विवाह सोहळ्याला बौध्द भिक्कू आदरणीय नाथ पुन्नो, बौध्द धम्माचे प्रचारक प्रा.सुभाष शेंडे, उपासिका नीता डोंगरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केले. या विवाह सोहळ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Nv5VXB

No comments:

Post a Comment