Breaking

Friday, June 2, 2023

आय एम सॉरी मम्मा, १२ वर्षांची लेक रडत-रडत आली, सत्य कळताच आईच्या पायाखालची जमीन सरकली https://ift.tt/hHgpwDi

ओक्लाहोमा: एक १२ वर्षांची मुलगी वारंवार आईची माफी मागत होती. मुलीला अचानक काय झाले हे आईला कळले नाही. नंतर जेव्हा या मुलीने आपल्या आईला सत्य सांगितलं ते ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. या मुलीने आपल्या ९ वर्षांच्या भावाची चाकूने भोसकून हत्या केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या फुटेजमध्ये मुलगी रडताना दिसत आहे. मग ती पोलिसांना विचारते की तिला तुरुंगात नेणार आहेत का? या असल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक केली आहे.अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यातील टुसला येथील हे प्रकरण आहे. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, या मुलीची आई एप्रेल लिडाने सांगितले की, ती वरच्या मजल्यावर झोपली होती. त्यानंतर तिची १२ वर्षांची मुलगी धावत तिच्याकडे आली आणि तिने आईला सांगितलं की तिने तिच्या भावाच्या छातीवर चाकूने वार केला आहे. व्हिडिओमध्ये ही मुलगी मला माफ कर, मला माफ कर म्हणत किंचाळत पायऱ्यांवरुन खाली पळताना दिसत आहे. पकडल्यावर मुलगी काय म्हणाली?लिडायाने पाहिले की तिचा मुलाच्या छातीवर जखम झाली आहे. मग ती आरडाओरड करु लागली, 'याच्या छातीत चाकूने मारल्याचे वार आहेत'. त्यांच्या मुलीने त्यांना सांगितलं की, 'मम्मा मला माफ कर. मला माहीत नाही नेमकं काय झालं.' हीच मुलगी जेव्हा पोलिसांनी तिला पकडलं तेव्हा पोलिसांना म्हणते की, 'हातकडी घालणं गरजेचं आहे का? मी एक चांगली मुलगी आहे'. ती अधिकाऱ्यांना रडत-रडत म्हणते की, 'मी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. मी माझं संपूर्ण भविष्य उध्वस्त केले आहे. मला या दुःस्वप्नातून जागे व्हायचे आहे. मला आधीच माहित आहे की मला आता आयुष्यभर तुरुंगात राहावं लागणार आहे. मी जे केले ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे'. लिडा यांनी मुलाला रुग्णालयात नेले. मात्र, त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. पोलिस स्टेशनमध्ये लिडायालाही पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागले. तिने सांगितले की तिच्या मुलीची वागणूक कधीही आक्रमक नव्हती. कुटुंबाच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितलं की मृत्यू झालेला मुलगा खूप चांगला होता, तो आपल्या भाऊ-बहिणीवर खूप प्रेम करायचा. पोलिसांनी १२ वर्षीय मुलीला ताब्यात घेतल्यानंतर तिने कबुली दिली की तिनेच आपल्या भावावर वार केले. सध्या या मुलीला ती अल्पवयीन असल्याने बालसुधार गृहात ठेवण्यात आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/D51wWOy

No comments:

Post a Comment