पॅरिस: एक माणूस सहा वर्षांपासून आपल्या आईच्या मृतदेहासोबत राहत होता. यामागील जे कारण समोर आलं आहे ते चीड आणणारं आहे. आईची पेन्शन मिळवण्यासाठी आपण असं केल्याचे त्या व्यक्तीने सांगितले आहे. तो त्याच्या मृत आईच्या निवृत्ती निधीतून पैसे घेत होता. आरोपी मुलाचे वय ६० वर्षे आहे. त्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही.डेली स्टारच्या वृत्तानुसार, आरोपीच्या मृत आईचे नाव हेल्गा मारिया हेंगबर्थ आहे. हे प्रकरण इटलीतील आहे. त्याने शेजाऱ्यांना सांगितले की हेल्गा तिच्या देशात, जर्मनीला परत गेली आहे. गेल्या सहा वर्षांपासून तो मृतदेहासोबत जगत असताना त्याला आतापर्यंत १५६,००० पाऊंड म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे १.५९ कोटी रुपये मिळाले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला अग्निशमन दल आणि पोलिसांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. त्यांना २५ मे रोजी आपत्कालीन सेवेसाठी इमारतीत प्रवेश करावा लागला होता.आईचा मृतदेह पिशवीत भरुन बेडवर ठेवलाहेल्गाचा मृतदेह एका पिशवीत भरून बेडच्या वर ठेवण्यात आला होता. तेव्हा हेल्गा यांचा मुलगा घरात उपस्थित नव्हता. कोरोना व्हायरसच्या काळातही हेल्गाने तिच्या आरोग्य विमा कार्डसाठी दावा केला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा संशय बळावला असता घराची झडती घेण्यात आली. जिथे त्यांना हेल्गाचा मृतदेह सापडला. यानंतर हेल्गाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला, जेणेकरून तिचा मृत्यू कसा आणि केव्हा झाला हे कळू शकेल.दरवर्षी लाखो रुपये घ्यायचाया प्रकरणाचा अजूनही पोलिस तपास करत आहेत. आरोपी आपल्या मृत आईची पेन्शन कशी घेत होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहे. तपासात पोलिसांना कळले की आरोपी मुलगा दरवर्षी ३० हजार युरो म्हणजेच सुमारे २६.५४ लाख रुपये आईच्या नावावर घेत होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3HhvCwT
No comments:
Post a Comment