नागपूर : बेंगळुरू ते दिल्ली येथे जाणारे ७ कोटी रुपयांचे ६८५ नवीन कोरे चोरणाऱ्याला गुजरातमधील सुरत येथून एका टोळीला अटक करण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. चोरट्यांनी मूळ कंटेनरमधून माल उतरवून दुसऱ्या ट्रकमध्ये टाकून गुजरातकडे पळ काढला होता. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने एखाद्या सिनेमाचा कथेनुसार आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना पाळत ठेवून अटक केली. या मोहिमेचे नेतृत्व अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील आणि उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनी केले.बेंगळुरू येथील एका कंपनीचे ६८५ लॅपटॉप लॉजिस्टिक एक्स्प्रेस नावाच्या वाहतूक कंपनीच्या कंटेनरमध्ये भरून दिल्लीला जात होते. २६ मे रोजी काही कपडे, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह ७.४३ लाख रुपयांचा माल कंटेनरमध्ये भरून दिल्लीला पाठवण्यात आला. हरीश हजार खान (२७, मेवाड, हरियाणा) हा चालक तर मोहम्मद मुस्तफा धन्ना खान (२४, पलवल, हरियाणा) हा त्याच्यासोबत क्लिनर होता. २९ मे रोजी कंटेनर नागपुरात पोहोचला. मात्र दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत त्यांचे जीपीएस लोकेशन पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिसत होते. चालक फोन उचलत नव्हता. त्यामुळे कंपनीचे मालक अमरनाथ गोविंद संग्राम हे काय झाले पाहण्यासाठी म्हणुन बंगळुरूहून नागपुरात आले. तर तो कंटेनर रिकामा होता आणि ड्रायव्हर आणि क्लिनर दोघांचे फोनही बंद होते. अखेर त्यांनी पारडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले आणि सायबर युनिटचे बलराम जाडोकार यांचे पथक तयार करण्यात आले. टोल बूथवर बसवलेले सीसीटीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हीलेन्सने पाळत ठेवल्याने आरोपी गुजरातच्या सुरतजवळील बारडोली येथे गेल्याचे उघड झाले. हरीश हाजर खान आणि मोहम्मद मुस्तफा धन्ना खान यांनी पारडी येथे असलेल्या दुसऱ्या कंटेनरमध्ये माल टाकला. हा कंटेनर गुजरातमधून शाहिद सफी मोहम्मद खान (२४, गुजरात) आणि आसिफ मसूद खान (२७, नहू, हरियाणा) यांनी आणला होता. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.दरम्यान, कळमना येथील ट्रक चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पोलीस उपनिरीक्षक दीपक ठाकरे हे पथकासह सुरतमध्ये होते. सुदर्शन यांनी तत्काळ आरोपींची माहिती देऊन त्यांना अटक करण्याचे निर्देश दिले. बारडोली पोलिसांच्या मदतीने ठाकरे यांच्या पथकाने तेथे जाऊन चार आरोपींना अटक केली. या आंतरराज्य टोळीचे गुजरातमधील अन्य सदस्यही होते. या टोळीतील सदस्यांनी अल्पावधीत ४५ लाख रुपयांचे लॅपटॉप आणि टीव्ही मॉनिटर विकल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींकडून ट्रकसह ९ कोटी ८ लाखांचा माल जप्त केला आहे. या टोळीने यापूर्वीही असे गुन्हे केल्याची शंका व्यक्त होत असून या संबंधित अधिक तपासात करण्यात येत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ROh6EJM
No comments:
Post a Comment