नवी दिल्ली : तुम्ही पहिल्यांदाच तुमचे आयकर रिटर्न (आयटीआर) भरण्याची तयारी करत असाल तर हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमचे रिटर्न फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (ई-फायलिंग) आयकर वेबसाइटद्वारे भरू शकता. तथापि, ८० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अपवाद आहे, जे विशिष्ट निकष पूर्ण करत असल्यास ते त्यांच्या उत्पन्नाचा परतावा पेपर मोडमध्ये दाखल करू शकतात. परंतु बहुतेक करदात्यांसाठी ITR ऑनलाइन भरणे अनिवार्य आहे.पहिल्यांदाच आयटीआर (आयकर रिटर्न) भरणाऱ्यांसाठी ते कठीण आणि गोंधळात टाकणारे काम असू शकते. परंतू काही सोप्या पद्धतींनी तुम्ही तुमचा तणाव बर्याच प्रमाणात कमी करू शकता आणि अधिक कार्यक्षम पद्धतीने ITR फाइल करू शकता. जसे की देय तारीख लक्षात घेऊन, करपात्र उत्पन्नाची अचूक गणना, आवश्यक कागदपत्रे जोडून आणि किती कर आकारला जात आहे याची खात्री करून कोणतीही व्यक्ती आरामात फाइल करू शकते.काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवाकागदपत्रे तयार ठेवातुमचे आयकर रिटर्न भरताना फॉर्म १६ आणि गुंतवणुकीचा पुरावा यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवा. तुमच्या पगाराच्या स्लिप्स, फॉर्म २६एएस तुमच्यासोबत असल्याची खात्री करा. तुमच्या एकूण उत्पन्नाची अचूक गणना करण्यासाठी आणि कपातीचा दावा करण्यासाठी हे आवश्यक असेल.फॉर्म १६एतुमच्या पगाराव्यतिरिक्त, इतर उत्पन्नाच्या स्रोतांसाठी फॉर्म १६ए आवश्यक असतो कारण यामध्ये तुमच्या उत्पन्नाचा तपशील असतो. हा फॉर्म तुमच्या उत्पन्नाचा स्रोत असलेल्या कंपनी किंवा संस्थेद्वारे जारी केला जातो. फॉर्म १६ए हा फॉर्म तुमच्या उत्पन्नातून आणि तुम्हाला केलेल्या पेमेंटमधून कापलेला TDS दाखवतो.आयकर स्लॅब समजून घ्यातुमचा आयकर स्लॅब काय आहे याबाबत नीट माहिती असायला हवी. अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात वार्षिक आयकराची नवीन प्रणाली जाहीर केली आहे. यात दोन भिन्न प्रणालींचा समावेश आहे. नवीन आणि जुन्या अशा दोन्ही व्यवस्था करदात्यांना कर सवलती मिळविण्याची संधी देतात. कर सवलत दावाआयटीआर भरताना तुम्हाला कलम ८०सी अंतर्गत कर सवलतीचा दाव्याचा लाभ घेता येतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमधील गुंतवणूक, NSC मधील गुंतवणूक, गृहकर्जाच्या मुख्य घटकाची परतफेड, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना, विम्यातील गुंतवणूक, ज्येष्ठ नागरिक बचत सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केली असल्यास कर सवलतीचा दावा करता येतो. कलम ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या जीवन विमा प्रीमियमवरही कर लाभ मिळवू शकता.तुमच्या पगाराचे घटक समजून घ्यातुमच्या पगारातील विविध घटक जसे की मूळ वेतन, भत्ते आणि कपातींचे नीट अवलोकन करा. याद्वारे तुम्हाला तुमच्या उत्पन्नाची अचूक गणना आणि तुम्हाला किती कर भरावा लागेल याची माहिती मिळेल.टीडीएस तपशील सत्यापित करातुमच्या फॉर्म २६एएस मध्ये दिलेल्या माहितीसह तुमच्या नियोक्त्याने कापलेली TDS रक्कम नीट तपासा. कोणत्याही चुका नाहीत याची खात्री करा आणि आवश्यक असल्यास दुरुस्तीसाठी तुमच्या नियोक्त्याशी संपर्क साधा.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Eawvpb6
No comments:
Post a Comment