नागपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे लाखो भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. पण वारकऱ्यांचे परतीच्या प्रवासात प्रचंड हाल होत असताना दिसत आहेत. नागपूर-पंढरपूर रेल्वेतून परतीच्या प्रवासात प्रंचड गर्दी झाल्याचे दिसले. एका कोचमध्ये ३०० पेक्षा अधिक प्रवासी होते. या गर्दीत महिला महिला प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले. कोचमध्ये इतकी गर्दी होती की महिलांना वॉशरूममध्ये जाण्यासाठी देखील जागा नव्हती. परतीच्या प्रवासात वारकऱ्यांना १६ तासांचा प्रवास करायचा आहे.अशा गर्दीत इतक्या तासांचा प्रवास कसा करायचा असा सवाल वारकरी विचारत होते. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करून देखील त्यांनी दुर्लक्ष केल्याची तक्रार वारकऱ्यांनी केली. शिंदे सरकारने फक्त घोषणा केल्या पण वारकऱ्यांसाठी सुविधा दिल्या नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया वारकऱ्यांनी यावेळी दिली.पंढरपूर वारीतून घरी परतत असणाऱ्या वारकरी महिलेचा मृत्यूपुणे सोलापूर महामार्गावर एका वारकरी महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा येथे झाला. मृत्यू झालेल्या वारकरी महिलेचे नाव दगडाबाई बाळू खुपसे (वय-६५) असे आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qv0GnlW
No comments:
Post a Comment