धाराशिव : तंदुर रोटी वेळेत का दिली नाही म्हणून ग्राहकाने वेटरची निर्घृण हत्या केल्याची घटना भूम तालुक्यातील अंबी येथे घडली आहे.अंबीजवळील अंबिका ढाबा येथे रात्री ८:३० वाजता आशिष बिभीषण शेजाळ (वय २७ वर्षे) हा तंदुर रोटी पार्सल आणायला गेला होता. तंदुर रोटी ऑर्डर केल्यानंतर तंदुर रोटी वेळेत न दिल्यामुळे चिडलेल्या आशिष बिभीषण शेजाळ याने हॉटेल अंबिका येथील वेटर लक्ष्मण उर्फ बप्पा पांडुरंग नलवडे (वय ३० वर्षे) याच्याशी हुज्जत घातली. वादावादी होऊन चिडलेल्या अशिष शेजाळ याने लक्ष्मण नलवडे याच्या छातीवर, पोटावर, पोटाच्या डावे बाजूस चाकूने सपासप वार केले. यात लक्ष्मण नलवडे हा गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या लक्ष्मण नलवडे याला अहमदनगर येथे उपचारासाठी नेण्यात आले. तो पर्यंत नियतीने डाव साधला होता. गंभीर जखमी असल्यामुळे लक्ष्मण नलवडे या मृत्यू झाला होता. लक्ष्मण नलवडे याची आई सिंधुबाई पांडुरंग नलवडे यांनी या प्रकरणी अंबी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. अंबी पोलीसानी आरोपी अशिष शेजाळ याला अटक केली. आरोपी अशिष शेजाळ याच्यावर कलम- ३०२, ३२३ अंतर्गत अंबी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक विक्रांत हिंगे हे करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FDhQ67w
No comments:
Post a Comment