Breaking

Saturday, June 24, 2023

एकनथ शद मबईकड नघल पण भरधव तफ एक करणन अचनक थबल; कतच जरदर चरच! https://ift.tt/V5goqdS

सातारा : आपल्या मुळगावाकडून मुंबईकडे परतताना यांनी संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं आहे. एकनाथ शिंदे यांचा ताफा अचानक एका गावाजवळ थांबल्याचं पाहायला मिळालं. निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत त्यांना माहिती मिळाली आणि आपल्या पदाचा, राजशिष्टाचाराचा बाऊ न करता मुख्यमंत्र्यांनी थेट जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद साधला. तसंच त्यांची आपुलकीने विचारपूस करत जिल्हा प्रशासनाला त्या वृद्ध दाम्पत्याच्या पुनर्वसनाचे निर्देश देऊन मुख्यमंत्री पुढे मार्गस्थ झाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या मूळगावी दरे येथे गेले आहेत. त्याचवेळी पिंपरीतांब गावातील एका गरीब दाम्पत्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्याचे निर्देश सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले. एकनाथ शिंदे यांनी आज तापोळा आणि दरे दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी एका ग्रामस्थाने त्यांना जवळच एक निराधार वृद्ध दाम्पत्य रहात असल्याचे निदर्शनास आणून दिले. क्षणाचाही विलंब न लावता शिंदे त्यांच्या भेटीला गेले. पिंपरीतांब येथील भागडवाडीतील ७५ वर्षाचे विठ्ठल धोंडू गोरे आपल्या पत्नीसह याठिकाणी राहतात. त्यांची देखभाल करणारं कुणीही नाही.तुटपुंज्या संसारात ते दोघं उघड्यावरच राहतात. मुख्यमंत्री शिंदे त्यांच्याजवळ गेले. थेट जमिनीवर बसून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पावसाळ्यात तुम्ही अशा अवस्थेत कसे राहणार? त्याऐवजी गावाजवळ का रहात नाही असे त्यांना विचारले. मात्र, त्यावर त्यांनी काहीही ठोस उत्तर दिले नाही. शेवटी मुख्यमंत्र्यांनी या दाम्पत्याला पावसाळ्यात लागेल तेवढे अन्नधान्य आणि मदत देण्याचे निर्देश दिले. अशा ठिकाणी राहत असल्याने त्यांना अचानक मदत लागल्यास कुणीही मदत करू शकणार नाही. त्यामुळे गावाजवळ रहावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी त्यांना केली. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना या वृद्ध दाम्पत्याचे त्वरित पुनर्वसन करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदेंनी दिले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yYiAuk0

No comments:

Post a Comment