Breaking

Saturday, June 17, 2023

नव मबई पलस दलत खदपलट; एकच वळ तबबल अधकऱयचय बदलय कणच कठ झल बदल? https://ift.tt/Vi2K3k5

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात कार्यकाळ पूर्ण झालेल्या १४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या इतरत्र करण्यात आल्या आहेत. त्यांच्या जागी नवे २१ पोलिस अधिकारी नवी मुंबईत दाखल होणार आहेत.पोलिस आस्थापना मंडळातर्फे प्रत्येक आयुक्तालयात सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले आहेत. विहीत कालावधी पूर्ण न झालेल्या पोलिस निरीक्षकांच्या विनंतीनुसार विशेष बाब म्हणून बदली झालेल्यांमध्ये पोलिस निरीक्षक सुनील पाटील (ठाणे शहर), शत्रुघ्न माळी (रायगड) या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच, सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलिस निरीक्षक स्मिता जाधव, नितीन गीते, निशिकांत विश्वकार, भारत कामत, राजू सोनवणे, विजय वाघमारे, संदीपान शिंदे, अर्जुन गरड, विजय कादबाने यांची ठाणे शहरात बदली करण्यात आली आहे. बापूराव देशमुख, प्रमोद पवार यांची मुंबई शहरात तसेच दत्तात्रय किंद्रे यांची पालघरमध्ये बदली करण्यात आली आहे. मुंबई पोलिस दलातील पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, संजय बेंडे, सुनील वाघमारे, दिपाली पाटील, अजय शिंदे, जितेंद्र मिसाळ यांचा समावेश आहे. तसेच, ठाणे शहरातील तुकाराम पवळे, गुलफरोज मुजावर, राजेंद्र कोते, रायगडमधील पोलिस निरीक्षक मारुती सकपाळ, मुंबई लोहमार्गात कार्यरत असलेले प्रवीण भगत यांची नवी मुंबईत बदली करण्यात आली आहे. गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षकांचे वाचक राजकुमार कोथमिरे, फोर्स वनमधील पोलिस निरीक्षक बापू ओवे, नंदूरबार जिल्हा जात पडताळणी समितीवरील नितीन ठाकरे, ठाणे ग्रामीण येथील घनश्याम आढाव, कोल्हापूर येथील औदुंबर पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस निरीक्षक ज्योती देशमुख, आबासाहेब पाटील, संजय पाटील, तसेच राज्य गुप्तवार्ता विभागातील सुरज पाटील यांची त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये कार्यरत असलेले भानुदास खटावकर यांची नवी मुंबईतील प्राथमिक संपर्क केंद्रात बदली करण्यात आली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kYD2lyw

No comments:

Post a Comment