Breaking

Monday, June 19, 2023

Monsoon Delayed : मनसनच आगमन रखडल रजय सरकरन दल महततवच अपडट शतकऱयन नमक कय सगतल? https://ift.tt/gl9V14y

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक :राज्यावर पाऊस लांबणीवर पडण्याचे नैसर्गिक अरिष्ट घोंघावते आहे. अशा परिस्थितीत पेरण्या केल्यास त्या व्यर्थ जाऊ शकतात. शेतकऱ्यांनी जूनमध्येच पेरण्या उरकण्याची घाई करू नये यासाठी दक्षता घ्या. त्यांना जुलैमध्ये पेरण्या करण्याबाबत अवगत करा, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. पावसाअभावी पेरण्यांचा खोळंबा होणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.गेल्या काही वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक बिघडले आहे. अवकाळी पाऊस तर कधीही शेतीवर तुटून पडतो. अवेळी झालेल्या गारपीटीने शेतपिकांची नासाडी केली. झालेल्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरू शकलेला नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागतात. पाऊस केव्हा पडेल आणि शेतीची कामे कशी मार्गी लावता येतील याचे नियोजन सुरू होते. १ जूनपासून पावसाचा हंगाम सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. ढगाळ वातावरणामुळे आज ना उद्या पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागते. परंतु, प्रत्यक्षात पाऊस पडत नाही. राज्यावर अलनिनो वादळाचा प्रभाव राहणार असून, त्यामुळे पाऊस लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज काही महिन्यांपूर्वीच हवामान विभागाने वर्तविला होता. जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण कमीच राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने जिल्हा प्रशासन पाणी उपलब्धतेचे नियोजन करू लागले. जूनच्या पहिल्या तीन आठवड्यांत जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. प्रत्येक तालुक्यात पावसाचा कमी-अधिक प्रमाणात शिडकावा झाला असला, तरी त्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यास दुबार पेरण्या करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव श्रीवास्तव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामीण पोलिसांचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाचा आढावा प्रारंभी घेण्यात आला. जून महिन्यात जिल्ह्यात एकूण सरासरीच्या १७.९ टक्के पाऊस झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता असून, त्यानंतरच पेरण्या करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना द्याव्यात, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. पेरण्या लवकर केल्या आणि पाऊस पडला नाही, तर दुबार पेरणी करावी लागू शकते. त्यामुळे बियाणे आणि शेतकऱ्यांची मेहनतदेखील वाया जाईल. म्हणूनच पावसाचा एकंदरीत अंदाज पाहता जुलैमध्ये पेरण्या कराव्यात, असे शेतकऱ्यांना आवाहन आहे, असं नाशिकचे जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/eLFYdm1

No comments:

Post a Comment