Breaking

Thursday, June 15, 2023

Monsoon Impact : मनसनच पऊस लबल भजपलयच दर भडकल बजरत नमक कय घडल? https://ift.tt/79qBdth

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: जून महिना अर्धा सरला तरी पावसाने ओढ लावल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी दोन महिन्यांपासून स्थिर असलेले भाजीपाल्याचे भाव आता वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात ४० ते ६० रु. प्रति किलो हा दर आता घाऊक बाजारातच दिसू लागला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाववाढ जाणवू लागली आहे. नजीकच्या काळात आणखी भाववाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत.गेल्या काही दिवसांत मागणीपेक्षा आवक वाढल्याने भाज्यांचे भाव उतरले होते. त्यामुळे बऱ्याच भाज्या घाऊक बाजारात १० ते १२ रु. किलो दराने मिळत होत्या. एप्रिल, मे महिन्यात तर भाज्यांचे घाऊक दर निम्म्यावर आले होते. नागरिक मोठ्या संख्येने गावी, परगावी गेल्याने मुंबईत भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे भाज्यांचे दर कमी झाले होते. मात्र आता मुंबईकर परतल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. मात्र मागणी वाढलेली असतानाच पाऊस लांबल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. भाव वाढल्याने मागणी असूनही भाजीपाल्याला उठाव मिळालेला नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत.किरकोळ बाजारात आत्तापर्यंत २० रु. किलोमध्ये मिळणारा टोमॅटो सध्या ४० रु.वर पोहोचला आहे. घाऊक बाजारात ८ ते १० रु. किलोपर्यंत असलेला टोमॅटो आता २२ ते २५ रु.पर्यंत पोहोचला आहे. तसेच कोथिंबिरीच्या दरातही दुप्पट वाढ झाली आहे. दहा रुपये एक जुडी असा भाव असलेली कोथिंबीर आता ३० रुपयांवर पोहोचली आहे. भाजी सध्याचे दर मागील किरकोळ दरभेंडी : सध्याचा दर : ६० ते ८० मागील किरकोळ दर : ४० ते ५०फरसबी: सध्याचा दर : ८० ते ९० मागील किरकोळ दर : ४० ते ६०गवार: सध्याचा दर : ७० ते ८० मागील किरकोळ दर : ५० ते ६०घेवडा : सध्याचा दर :६० ते ८० मागील किरकोळ दर :५० ते ६०कारली : सध्याचा दर : ६० ते ८० मागील किरकोळ दर : ५० ते ५५ढोबळी मिरची : सध्याचा दर : ७० ते ८० मागील किरकोळ दर : ६० ते ६५शेवगा शेंग : सध्याचा दर : ८० ते ९० मागील किरकोळ दर : ५० ते ६०सुरण : सध्याचा दर :८० ते ९० मागील किरकोळ दर : ६० ते ७०मटार : सध्याचा दर :१०० ते ११० मागील किरकोळ दर : ६० ते ८०हिरवी मिरची : सध्याचा दर : ८० ते ९० मागील किरकोळ दर : ५० ते ६०


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BR41rFA

No comments:

Post a Comment