म. टा. प्रतिनिधी, मुंबई : माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेने उद्या रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. वसई रोड आणि वैतरणा दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)स्थानक : माटुंगा ते मुलुंडमार्ग : अप आणि डाऊन धीमीवेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५परिणाम : ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. मुख्य मार्गावरील लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.हार्बर रेल्वेस्थानक : कुर्ला ते वाशीमार्ग : अप आणि डाऊनवेळ : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर/वाशी दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द असतील. ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध राहतील. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येतील.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DR8kYqv
No comments:
Post a Comment