Breaking

Sunday, June 18, 2023

NPS: नशनल पनशन ससटममधन पस कढणयच नयम बदलणर लगच जणन घय https://ift.tt/GEknUo7

नवी दिल्ली : पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) सदस्यांसाठी पद्धतशीर पैसे काढण्याची योजना सुरू करण्याचा विचार करत आहे. प्रस्तावित योजना सदस्यांना वयाच्या ७५व्या वर्षापर्यंत मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक यांसारख्या नियतकालिक पैसे काढण्याची निवड करण्यास संधी देईल. PFRDA या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात एक विशेष नवीन नियम लागू करू शकते. या अंतर्गत राष्ट्रीय पेन्शन प्रणालीचे (NPS) ग्राहक पद्धतशीरपणे ६०% रक्कम काढू शकतात. यापूर्वी फक्त एकदाच पैसे काढण्याची परवानगी होती. PFRDA च्या या बदलाचा लाखो लोकांना फायदा होऊ शकतो कारण या निर्णयानंतर NPS लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.या लोकांसाठी नवीन नियमावलीची शक्यताप्रस्तावानुसार NPS सदस्यांना निवृत्तीनंतर वयाच्या ७५व्या वर्षापर्यंत त्यांच्या कॉर्पसपैकी ६०% रक्कम पद्धतशीरपणे काढण्याची परवानगी असेल, तर एकरकमी पैसे काढण्याच्या सध्याच्या प्रणालीऐवजी ४०% वार्षिकीमध्ये गुंतवावे लागतील. पीएफआरडीएचे अध्यक्ष दीपक मोहंती म्हणाले, "आम्ही या वर्षाच्या उत्तरार्धापासून पद्धतशीर पैसे काढण्याची योजना सुरू करण्याचा विचार करत आहोत. ही रक्कम एकरकमी किंवा मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर काढू शकतो. हे ६० ते ७५ वयोगटातील लोकांना लागू होते." तरुण ग्राहकांवर लक्ष्यचालू आर्थिक वर्षात, NPS ला गैर-सरकारी क्षेत्रातून १.३ दशलक्ष नवीन सदस्य जोडण्याची अपेक्षा आहे. वर्षभरापूर्वीच्या काळात ही संख्या एक दशलक्ष होती. गेल्या वर्षी NPS ने १२ दशलक्ष ग्राहक जोडले आणि या आर्थिक वर्षात १३ दशलक्ष जोडण्याची योजना आहे. ते म्हणाले की अटल पेन्शन योजनेची ग्राहक संख्या ५.४ कोटी आहे.मोहंती म्हणाले की, येत्या काळात राज्यांनी जुनी पेन्शन योजना निवडली तरी एनपीएसमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातून ग्राहकांची संख्या वाढेल. APY ची रणनीती म्हणजे १८ वर्षे पूर्ण झालेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नोंदणी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. जेणेकरून सर्व सदस्यांना पेन्शनचा लाभ मिळू शकेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xuN7JcD

No comments:

Post a Comment