Breaking

Sunday, July 30, 2023

Bullet Train :शिंदे सरकारकडून मोदींना महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी गुड न्यूज, बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठा निर्णय https://ift.tt/4zgmjNv

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील मोठा अडथळा राज्य सरकारने दूर केला आहे. राज्यातील १२९ हेक्टर वन जमीन या बुलेट ट्रेन उभारण्यासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकाराने घेतला आहे. ही जमीन नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला (एनएचएसआरसीएल) देण्याचा शासन निर्णय नुकताच महसूल आणि वन विभागाने जारी केला आहे.बोरिवलीस्थित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह, ठाणे, डहाणू आणि खारफूट कक्षातील एकूण १३१.३० हेक्टर अर्थात, सुमारे ३२३ एकर जमीन राष्ट्रीय हायस्पीडला देण्याचे प्रस्तावित होते. वन विभागाने प्रस्तावाची छाननी केली. त्यानंतर १२९.७१ हेक्टर (सुमारे ३२० एकर) वन जमीन देण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. यामध्ये तुंगारेश्वर अभयारण्य, बोरिवली राष्ट्रीय उद्यानातील काही एकर जमिनीचा समावेश आहे. सध्या या ठिकाणी प्राणी-पक्षी यांचा नैसर्गिक अधिवास आहे. वन जमिनीतील किती झाडे बाधित होणार आहेत, याचा तपशील एनएचएसआरसीएलकडून जाहीर करण्यात येणार आहे. जमिनीचा ताबा मिळाल्यावर सर्वेक्षणास सुरुवात करण्यात येणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.वन जमिनीच्या हस्तांतरणाला मंजुरी दिल्यामुळे राज्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पातील भू संपादनाचे प्रमाण ९९.४५ टक्क्यांवर पोहोचले आहे. यात राज्यातील ९९.७९ टक्के, दादरा आणि नगर हवेलीतील १०० टक्के आणि गुजरातमधील ९९.३० टक्के जमिनींचा समावेश आहे. देशातील पहिल्या बुलेट ट्रेन उभारणीसाठी राज्यातील सर्व बांधकामासाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे. गुजरातमध्ये तीनशे किमी लांबीचे खांब उभारणी पूर्ण झाली आहे. बुलेट ट्रेनसाठी वन जमीन (सर्व आकडे हेक्टरमध्ये)विभाग – मूळ प्रस्ताव जागा – सुधारित प्रस्ताव जागाठाणे – ५४.१२५९ – ४९.५३४५डहाणू – ६८.६६४४ – ७१.६७३६खारफुटी – ८.३९७८ – ८.३९७८राष्ट्रीय उद्यान (बोरिवली) -०.११३८ – ०.११३८एकूण – १३१.३०१९ - १२९.७१९७(स्रोत– महसूल व वन विभाग, शासन निर्णय)दरम्यान, आता या प्रकल्पाचं काम नेमकं कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qu4cLlG

No comments:

Post a Comment