Breaking

Sunday, July 16, 2023

बदला घेण्यासाठी गेले, पण स्वतःच्याच टोळीतील गुंडावर गोळी झाडली, कल्याणमध्ये काय घडलं? https://ift.tt/2doKqQe

अंबरनाथ : कल्याणमधील एका गुंडावर प्रतिस्पर्धी टोळीकडून काही दिवसांपूर्वी गोळीबार करून गंभीर जखमी केले होते. त्याचा बदला घेण्याच्या शोधात आलेल्या भावासह दोन साथीदारांनी प्रतिस्पर्धी टोळीतील एकाला रस्त्यातचं गाठलं आणि पिस्तूल दाखवत धमकी दिली. माझ्या भावावर गोळीबार करणार कुठे आहे, असं बोलताच बाचाबाची होऊन गोळीबार करण्यात आला. मात्र गोळीबारात स्वतःच्याच टोळीतील गुंडाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना बदलापूर-अंबरनाथ मार्गावरील ढाब्यासमोर घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार तीन गुंडांवर गुन्हा दाखल करून गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक केली. तर गोळीबारात जखमी झालेल्या गुंडांवर उपचार सुरू असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे. चंदन जुबराज भदोरिया (रा. कल्याण पश्चिम) रोहितसिंग पुरणसिंग पुना (रा. उल्हासनगर) असे अटक केलेल्या गुंडांची नवे आहेत. तर आलोक रामानंद यादव (रा. अंबरनाथ ) असे गोळीबारात गंभीर जखमी असलेल्या गुंडाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक गुंड चंदन याच्या भावावर काही दिवसांपूर्वी प्रतिस्पर्धी टोळीतील विवेक नायडू या गुंडाने गोळीबार केला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच गोळीबाराचा बदला घेण्यासाठी गुंड चंदन हा आपल्या दोन साथीदारांसह नायडूचा शोध घेऊन त्याच्यावरही गोळीबार करण्याचा त्यांनी कट रचला. त्यातच गुंड चंदन, त्याचे साथीदार रोहितसिंग आणि आलोक हे तिघे १५ जुलै रोजी दुपारी बदलापूरच्या बारबी डॅमवरून पार्टी करून आपल्या दुचाकीने कल्याणच्या दिशेने येत होते.त्याच सुमारास बदलापूर - अंबरनाथ मार्गावरील ढाब्यासमोर गुंड नायडूचा एक मित्र दिसला असता, त्याला दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास रस्ताच गाठून त्याच्याकडे नायडू कुठे आहे? अशी विचारणा करून गुंड चंदनने पिस्तूल काढून त्याला धमकी दिल्याने बाचाबाची होऊन चंदनच्या पिस्तूलमधून गोळी सुटून ती त्याचाच साथीदार आलोकच्या मांडीत घुसली तर नायडूचा मित्र घटनास्थळावरून पळून गेल्याने तो बचावला.दरम्यान, गुंड आलोक याला चंदन आणि रोहितसिंग या गुंडानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुसरीकडे गोळीबाराची खबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना मिळताच त्यांनी गोळीबारातील दोन्ही गुंडाचा शोध घेऊन काही तासातच अटक केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/s8einWz

No comments:

Post a Comment