Breaking

Saturday, July 15, 2023

हृदयद्रावक! आईचा उपचारादरम्यान मृत्यू, ऐकताच लेकीला दु:ख अनावर, शिवमंदिरात गेली अन्... https://ift.tt/ZAnazm9

रांची: उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळातच मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून परिसरात एकच शोककळा पसरली आहे. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना झारखंडमधील धनबाद येथील धनसार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनईटाड कुम्हार पट्टीची आहे. नवल किशोर सिंह यांची २५ वर्षीय मुलगी सविता कुमारीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. नवल यांच्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू होते, यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मुलीला आईच्या मृत्यूची माहिती मिळताच तिने मनईटाड येथील शिवमंदिरात जाऊन विहिरीत उडी घेतली.पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाया घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तिला विहिरीतून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील कारवाई सुरू आहे.तणावातून मुलीले ही टोकाचं पाऊल उचललंया हृदयद्रावक घटनेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे. लोक म्हणतात की मुलगी तिच्या आईच्या खूप जवळ होती. आईच्या मृत्यूनंतर ती नैराश्यात गेली आणि तिने कठोर पाऊल उचलले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/r6vROc1

No comments:

Post a Comment