पुणे : रात्रीच्या किरर अंधारात संपूर्ण गाव झोपलेले....मुसळधार पाऊस कोसळत होता...मात्र पहाटेच्या सुमारास डोंगरावरची दरड कोसळली.... अन् माळीण नावाचं गाव संपूर्ण डोंगराखाली गाडलं गेलं....तो दिवस होता ३० जुलै २०१४ चा....सकाळी सर्वांची धावाधाव...कारण संपूर्ण गावच दिसेनास झालं... संपूर्ण प्रशासनाची धावपळ सुरू झाली....या दुर्घटनेत १५१ जणांचा मृत्यू झाला....माळीण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गाव....आठ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेच्या जखमा ताज्या असतानाच आज पहाटे इर्शाळवाडीतील दरड कोसळली आणि काळजात धस्स झालं..... आठ वर्षांपूर्वीचा तो घटनाक्रम जशाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला. इर्शाळवाडीतील या घटनेने संपूर्ण देश हारदला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्या गावांवर ही परिस्थिती ओढवली आहे त्यांना आजच्या घटनेने सर्व समोर आठवल. कुणावरही अशी वेळ येऊ नये अशी भावना घटना पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात होत्या. जशा माळीण आणि तळीये घटना मन सुन्न करणारी अशी होती. तशीच आजची घटना काळजाला ठाव घेणारी आहे. कुटुंबियांचा रडण्याचा आक्रोश... पोट तिडकीने येणारे ते आवाज सर्व काही सुन्न करणारच होतं. माळीण प्रशासनाने पुन्हा उभे केले. आता मात्र ज्यांची माणसे गेली त्यांच्या वेदनांच तशाच मनात घर करून आहे. आजच्या घटनेतही अनेकांची कुटुंबातील कर्त्या व्यक्ती गेल्या...काहींची मुलं गेली. सर्व काही डोळ्यासमोर. अजूनही मातीच्या ढिगाऱ्याखाली किती आडकले आहेत. याची काही माहिती नाही. मात्र आजच्या घटनेने माळीण, तळीयेच्या घटनेच्या आठवणी ताज्या करून दिल्या आहेत. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत पोहचवली जात असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडून आता डोंगर भागात राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yQGeiCj
No comments:
Post a Comment