Breaking

Tuesday, July 11, 2023

दुकानावर जाण्यासाठी निघाला, रस्त्यात अनर्थ घडला; अपघातानं दोन लेकरांचं पितृछत्र हरपलं https://ift.tt/a7EuTbl

जळगाव : जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात उड्डाणपुलाजनजीक महामार्गावर ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. स्वप्निल सुरेश जोशी (वय-३५, रा. देवीदास कॉलनी,) असे मयताचे नाव आहे. अपघातानंतर डंपरचालक वाहन घटनास्थळावर सोडून पसार झाला आहे. जळगाव शहरातील देवीदास कॉलनी परिसरात स्वप्निल जोशी हा तरूण आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होता. प्रेम नगरात त्याचे किराणामालाचे दुकान होते. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास स्वप्निल जोशी हा त्याच्या एमएच १९ बीएस ४१३ या दुचाकी ने इच्छादेवी चौकाकाडून काम आटोपून प्रेमनगरातील त्याच्या किराणादुकानाकडे निघाला. यादरम्यान आकाशवाणी चौकातून जात असताना गणपती हॉस्पिटलसमोरील उड्डाण पुलानजीक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच १९ सीवाय ५७८८ या क्रमाकांच्या डंपरने ओव्हरटेक करत असतांना दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत स्वप्निलच्या डोक्याला डंपरचा फटका बसल्याचे तो जागीच ठार झाला. ही घटना घडल्यानंतर वाहन चालक हा डंपर सोडून पसार झाला होता. चार वर्षांचा मुलगा अन् नऊ महिन्यांच्या चिमुकलीचे पितृछत्र हरपलेआकाशवाणी चौकात वाहतूक शाखेचे गस्तीवर असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल हर्षद गवळी आणि चालक दिपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी स्वप्निल या वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.दरम्यान मयत स्वप्निल हा पोलीस अधिक्षक कार्यालयात सेवानिवृत्त कार्यालय अधिक्षक सुरेश जोशी यांचा मुलगा आहे. त्यांच्या पश्चात आई स्मीता, वडील, पत्नी समिधा, मुलगा वेद (वर्ष-४), मुलगी समिक्षा (९ महिने) आणि एक भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर कुटुंबियांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळावर चालक सोडून गेलेला डंपर ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rDIqGJ

No comments:

Post a Comment