Breaking

Tuesday, July 11, 2023

Navi Mumbai: गृहिणींचं टेन्शन वाढलं, भाजीपाल्यानंतर डाळींसह कडधान्येही महागली; वाचा धान्यांचे दर... https://ift.tt/1ZBnkNR

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : भाज्यांचे दर वाढल्याने आता गृहिणींनी आपला मोर्चा डाळी आणि कडधान्यांकडे वळवला आहे. मात्र, त्यांच्या दरांमध्येही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तूरडाळीचे दर १२० ते १४० रुपये किलोवर पोहोचले, तर कडधान्यांनी शंभरी पार केली आहे.वातावरणातील बदल आणि वारंवार झालेला अवकाळी पाऊस यामुळे यावर्षी कृषिमालाचे मोठे नुकसान झाले. अन्नधान्याच्या उत्पादनात काही प्रमाणात घट झाली. अनेक प्रकारच्या अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदा तूरडाळीचे उत्पन्नही कमी झाले आहेत. त्यातच तूरडाळीची आयात बंद आहे. त्यामुळे बाजारात फार कमी प्रमाणात तूरडाळ उपलब्ध असल्याने तूरडाळीच्या दरात वाढ सुरू झाली आहे. त्यानुसार सर्वसाधारण, गुजरात, लातूर येथील तूरडाळ १२० ते १४० रुपये किलो झाली आहे. तर उत्तम दर्जाची नटराजची तूरडाळ १४८ ते १५८ रुपये किलो झाली. याचप्रमाणे इतर डाळींचे दरही चढेच असल्याचे पाहायला मिळत आहे.मूगडाळ १०८ ते १२१ रुपये किलो, उडीदडाळ ११० ते १३० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. चणाडाळीचे दर कमी असून ते ६८ ते ७५ रुपये किलो आहेत. मसूर डाळ ७८ ते ८६ रुपये किलोपर्यंत आहे. कडधान्यांमध्ये वाल २४० ते २५० रुपये किलो, काबुली चणे १२० ते १४० रुपये किलो झाले आहेत. उत्पादन कमी असल्याने, ही टंचाई निर्माण होऊ लागली आहे. म्हणून दर वाढीव आहेत, असे व्यापारी खिमजी भाई गजरा यांनी सांगितले.कडधान्यांचे दरही चढेचअख्खा मूग -१०० ते १२० रु. किलोमटकी ११० ते १३० रु. किलोपांढरा वाटाणा ६४ ते ७२ रु. किलोलाल चणा ६० ते ७५ रु. किलोकाबुली चणा -१२० ते १४० रु. किलोवाल - २४० ते २५० रु. किलो


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/F6rdEOx

No comments:

Post a Comment